शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात भाजपमधील अंतर्गत कलहाचा राजकीय बळी, आता झाले तीन गट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 12:34 IST

पालकमंत्र्यांना काटशह

चंद्रशेखर जोशीजळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघातून आमदार स्मिता वाघ यांना मिळालेली उमेदवारी सरळमार्गे नव्हती. शह काटशहातून ती मिळाली खरी पण पालकमंत्र्यांच्या गटास यानिमित्त काटशह देण्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे यशस्वी ठरले असल्याचेच लक्षात येत आहे. यानिमित्त आमदार हरिभाऊ जावळे यांच्याबाबतीत घडलेल्या ‘तिकीट कापणे’ प्रकाराचीच पुनरावृत्ती झाल्याचेही बोलले जात आहे.भाजपाकडून जळगाव लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रारंभापासून स्पर्धा होती. या स्पर्धेत आमदार स्मिता वाघही होत्या. त्यांच्याबरोबर या स्पर्धेत उन्मेश पाटील यांचे केवळ नाव घेतले जात होते ते व्यक्तीश: फारसे इच्छूक नव्हते. इच्छूक होते ते बांधकाम क्षेत्रातील तांत्रिक सल्लागार प्रकाश पाटील, विद्यमान खासदार ए.टी. पाटील, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार.संकट मोचकांची नाराजीआमदार स्मिता वाघ व त्यांचे पती भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे विद्यार्थी परिषद चळवळीतील. त्यामुळे त्यांचे व पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी बऱ्यापैकी सख्य, यामुळे या तिघांची पसंती वाघ यांनाच होती. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गळी ते उतरविले व स्मिता वाघ यांना उमेदवारी मिळाली. यामुळे संकट मोचक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची नाराजी होती.जिल्ह्यातूनही नाराजीस्मिता वाघ यांचे पक्षांतर्गत संबंध हे सर्वांशी चांगले मात्र त्यांचे पती उदय वाघ यांच्यावर नाराज असलेला पक्षात एक मोठा वर्ग आहे. अगोदर ते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे समर्थक म्हणून परिचित होते. त्यानंतर बदलत्या हवेबरोबर ते गिरीश महाजन यांच्याकडे वळले. हे करत असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशीही असलेल्या संबंधांचा त्यांनी सोयीस्कर वापर करून घेतला, असे पक्षातील कार्यकर्ते सांगतात. त्यातच खासदार ए.टी. पाटील, अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी यांच्याशीही त्यांचे वाजलेलेच. त्यामुळे कार्यकर्त्यांप्रमाणेच नेता वर्गही त्यांच्या विरोधात होता. यामुळेच पक्षातून उमेदवारी बदलाचा दबाव वाढत गेला. या दबावाचा फायदा घेत अतिशय नियोजनबध्द व्यूहरचना करून स्मिता वाघ यांची उमेदवारी कापली गेली. उदय वाघ यांच्या विरोधातील नाराजी, खडसे, महाजन व आता पालकमंत्री गटाचे पक्षातील राजकारण हेच यानिमित्त समोर आले आहे.तिकीट कापण्याची पुनरावृत्ती२०१४ च्या निवडणुकीत रावेर लोकसभा मतदार संघातून आमदार हरिभाऊ जावळे यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाली होती. मात्र त्यावेळी रक्षा खडसे यांचे नावे पुढे केले गेले. यात उदय वाघ हे पुढे होते असे पक्षातील कार्यकर्ते सांगतात. त्यामुळे हरिभाऊ जावळेंची उमेदवारी निश्चित झालेली रद्द केली गेली. त्याच घटनेची पुनरावृत्ती यावेळी झाली फरक एवढाच की त्यावेळी उमेदवारी दाखल नव्हती व एबी फॉर्मही दिला नव्हता. यावेळी त्या विरोधात झाले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव