शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंचनाम्यात विहीरच बदलली, विरोधकांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 06:22 IST

विहीरीत पोहले, एवढ्याशा शुल्लक कारणावरून वाकडी (ता. जामनेर) येथील मातंग समाजातील दोन अल्पवयीन मुलांची नग्न धिंड काढण्यात आल्याच्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. पंचनामा करताना पोलिसांनी घटनेतील विहिरीच बदलविल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

जळगाव  - विहीरीत पोहले, एवढ्याशा शुल्लक कारणावरून वाकडी (ता. जामनेर) येथील मातंग समाजातील दोन अल्पवयीन मुलांची नग्न धिंड काढण्यात आल्याच्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. पंचनामा करताना पोलिसांनी घटनेतील विहिरीच बदलविल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.विहीरीत पोहल्याच्या कारणावरुन संबंधित विहिरीचा मालक ईश्वर जोशी व नोकर प्रल्हाद लोहार यांनी मातंग समाजातील दोन अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण करत त्यांची गावातून नग्न धिंड काढली. रविवारी घडलेल्या या आमानुष घटनेचा व्हिडिओ गुरुवारी सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेची वाच्यता फुटली. या घटनेबद्दल सर्वत्र संताप व्यक्त झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.पुरोगामी महाराष्टÑात घडलेल्या या घटनेबद्दल अनेकांनी संताप व्यक्त करत सरकारला धारेवर धरले. तक्रार मागे घ्यावी म्हणून या घटनेतील पीडितांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. या प्रकरणाची सुनावणी जलद न्यायालयात होणे आवश्यक असून त्यामुळे जनतेत योग्य संदेश जाईल, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.दरम्यान, शुक्रवारी अनेक संघटनांचे पदाधिकारी वाकडी गावाला भेट देऊन वस्तूस्थिती जाणून घेतली. तपास यंत्रणेवर सत्ताधाऱ्यांकडून दबाव येत असून पंचनाम्यात पोलिसांनी घटनेतील विहिरीच बदलविल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलाआहे.सत्तार व ग्रामस्थांमध्ये वादघटनेची माहिती जाणून घेण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे एक पथक शुक्रवारी वाकडी येथे आले होते. या घटनेला राजकीय स्वरुप दिले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे काही वेळ सत्तार व गावकºयांमध्ये वाद- विवाद झाला. यानंतर आमदार सत्तार यांनी पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांची भेट घेऊन, घटनेचा तपास निष्पक्षपणे करावा, अशी मागणी केली. यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री व जामनेर मतदार संघाचे आमदार गिरीश महाजन यांनीही या गावाला भेट देऊन विहिरीची पाहणी केली.प्रसारमाध्यमांवर रोष : वाकडी येथे कोणताही जातीय संघर्ष, तणाव नसतांना प्रसार माध्यमांनी अतिरंजीत वृत्त दिल्याचा आरोप वाकडीच्या ग्रामस्थांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर केला. त्यावेळी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी व ग्रामस्थांमध्ये काही क्षण वाद झाला.वाकडीत घडलेली घटना दुर्देवी आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे. पोलिसांनी गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई केली असून, कुणाचीही गय केली जाणार नाही; मात्र या घटनेचे कुणी राजकारण करू नये. वाकडी गावात सर्व जाती-धर्माचे लोकसंख्याने राहतात. शांततेचा भंग होईल, असा प्रयत्न कुणी करू नये.-गिरीश महाजन, जलसंपदा मंत्रीगोरगरीब, दलित, मागासवर्गीयांवर दबावाचे राजकारण करून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. वाकडीच्या घटनेत पीडितांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही.- अब्दुल सत्तार, आमदार, सिल्लोड

टॅग्स :newsबातम्याJalgaonजळगाव