शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव महापालिका निवडणूक : ढंढोरे कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 14:19 IST

नगरपालिका व आताची महानगरपालिका आणि ढंढोरे कुटुंब असे समिकरण तयार झाले आहे. शनीपेठ भागातून सलग २७ वर्षे प्रतिनिधीत्व करणाऱ्या माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंढोरे यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात आहे.

ठळक मुद्देराजकारणातील कुटुंब एकाच प्रभागात २७ वर्षे वर्चस्वतिन्ही महिलांना नगरसेवकपदाची संधी

जळगाव : तत्कालिन नगरपालिका व आताची महानगरपालिका आणि ढंढोरे कुटुंब असे समिकरण तयार झाले आहे. शनीपेठ भागातून सलग २७ वर्षे प्रतिनिधीत्व करणाऱ्या माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंढोरे यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात आहे.माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी जळगावच्या राजकारणात सर्व जाती व धर्माच्या व्यक्तींचा समावेश करून घेत जळगावच्या विकासासाठी प्रयत्न केले. यामध्ये माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंढोरे हे सुरुवातीपासून माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे खंदे समर्थक राहिले आहेत.स्वातंत्र्यपूर्व काळातील राजकीय प्रवासशिवचरण ढंढोरे यांचे वडील कन्हैय्यालाल ढंढोरे हे मुळचे काँग्रेसच्या विचारांचे. तर त्यांचे काका कॉ.सुकदेवराव ढंढोरे हे कम्युनिस्ट विचारसरणीचे. दोन्ही बंधूंनी आपल्या राजकीय व सामाजिक कार्याला १९४७ पासून सुरुवात केली. गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात ढंढोरे कुटुंबातील दोन्ही भावांनी सक्रिय सहभाग नोंदविला. या दरम्यान समाजाचे प्रमुख म्हणून काही काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली.१९८५ मध्ये नगरपालिकेत प्रतिनिधीत्ववडिलांकडून राजकारणाचा वारसा प्राप्त झाल्यामुळे १९८३ मध्ये शिवचरण ढंढोरे यांची शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यानंतर १९८५ मध्ये त्यांनी नगरपालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवारी केली. त्यात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या पॅनलचे उमेदवार रमेश भुसर यांचा पराभव करीत नगरपालिकेत प्रतिनिधीत्व केले.पहिल्या निवडणुकीत यश मिळाल्यानंतर तब्बल २७ वर्षे या कुटुंबाकडे या प्रभागाचे प्रतिनिधीत्व राहिले. २०१३ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत मात्र ढंढोरे कुटुंबातील कुणीही सदस्य नव्हते. या निवडणुकीत मात्र प्रभाग ४ अ मधून ते शिवसेनेचे उमेदवार आहेत.तिन्ही महिलांना नगरसेवकपदाची संधीमाजी नगराध्यक्ष शिवचरण ढंढोरे यांच्या व्यतिरिक्त कुटुंबातून त्यांची आई जानकाबाई ढंढोरे व पत्नी शशीबाई ढंढोरे या नगरपालिका निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. तर सून रंजिता अनुपसिंग ढंढोरे या २००३ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. ढंढोरे कुटुंबातील तीन महिलांना नगरसेवकपदाचा मान मिळाला.नगराध्यक्षपदासह विविध पदांवर कामशिवचरण ढंढोरे यांनी १९९५ मध्ये उपनगराध्यक्षपद सांभाळले. त्यानंतर २००३ मध्ये नगराध्यक्षपदाची तर त्यानंतर मनपा आरोग्य सभापती, दीक्षा भूमी सभापती या जबाबदारी पार पाडल्या आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक