शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव महापालिका निवडणूक : एकनाथराव खडसे गटाचे इच्छूक नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 12:57 IST

निष्ठावंतांना डावलले

ठळक मुद्देसमाजमाध्यमांवर नाराजीचा सूरतिकीट न मिळालेले भाजपा कार्यालयात

जळगाव : मनपा निवडणुकीसाठी भाजपाकडून मंगळवारी ३६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. मात्र, यामध्ये अनेक निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना डावलल्यामुळे नाराजी आहे. काल-परवा इतर पक्षातील आयात केलेल्या उमेदवारांना पक्षाकडून तिकीट दिले जात असून, खडसे समर्थकांपैकी केवळ ४ जणांना संधी दिल्याचे समजते. या प्रकारामुळे भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी दिवसभर सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली.भाजपामध्ये सध्या इतर पक्षातील नगरसेवकांचे ‘इनकमींग’ वाढले आहे. गेल्या चार दिवसाच्या राजकीय घडामोडींमध्ये मनसे, खाविआ, राष्टÑवादीचे तब्बल १८ नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये महापौरांचाही समावेश आहे. त्यामुळे या सर्व आयात उमेदवारांना भाजपाकडून उमेदवारी देण्यावर भर दिला जात आहे.मात्र, यांचा विचार करताना अनेक वर्षे भाजपाचे झेंडे हातात घेवून आंदोलने करणाºया निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाºयावर सोडून दिल्यामुळे भाजपा कार्यालयात नाराज पदाधिकाºयांची गर्दी झाली होती.सोशल मीडियावर व्यक्त केली नाराजीऐनवेळी उमेदवारी रद्द झाल्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली. निरंजन शेलार यांनी आपल्या फेसबूक पेज वर नाराजी व्यक्त करत, महापौरांचा रुपाने मोठा मासा गळाला लागल्याने सामान्य कार्यकर्त्यांना डावलले गेले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच काही विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापल्याची चर्चा दिवसभर होती. तर नाराज पदाधिकारी इतर पक्षांकडून निवडणूक लढविण्याबाबतचे संदेश देखील दिवसभर सोशल मीडियावर फिरत होते.तिकीट न मिळालेले भाजपा कार्यालयातमनपा निवडणुकीसाठीच्या भाजपाच्या सर्व हालचाली या भाजपा कार्यालयाऐवजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयातून सुरु आहेत. त्यामुळे सर्व पदाधिकारी व नेत्यांची गर्दी ही संपर्क कार्यालयातच होत आहे. मंगळवारी भाजपाकडून संभाव्य ७५ उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्यामुळे सकाळी १० वाजेपासून इच्छुकांनी गर्दी केली होती. मात्र, दुपारनंतर काही उमेदवारांचा पत्ता कट केल्याने अनेक पदाधिकाºयांमध्ये तीव्र नाराजी पहायला मिळाली. तर काही पदाधिकाºयांना आपले अश्रू अनावर झाले. ज्यांची उमेदवारी निश्चित झाली तेच उमेदवार संपर्क कार्यालयात थांबून होते. तर नाराज पदाधिकाºयांनी भाजपा कार्यालयात गर्दी केली होती.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव