शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव महापालिका निवडणुकीत ४९ जागांवर १४५ महिलांची उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 15:26 IST

मनपा निवडणुकीत ७५ पैकी ३८ जागा महिलांसाठी राखीव असल्याने महिला सदस्यांची संख्या पुरूष सदस्यांपेक्षा जास्त राहणार असतानाच महिला राखीव नसलेल्या जागांवरही महिलांनी उमेदवारी केली आहे. तब्बल ४९ जागांवर १४५ महिला उमेदवार रिंगणात आहेत. महापौरपद याआधीच इतर मागासवर्ग संवर्गातील महिलेसाठी राखीव असल्याने मनपामध्ये ‘महिलाराज’ कायम राहणार आहे.

ठळक मुद्देप्रत्यक्षात ७५ पैकी ३८ जागा महिलांसाठीजळगाव महापालिकेत कायम राहणार ‘महिलाराज’३८ जागांवर म्हणजे ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण

जळगाव : मनपा निवडणुकीत ७५ पैकी ३८ जागा महिलांसाठी राखीव असल्याने महिला सदस्यांची संख्या पुरूष सदस्यांपेक्षा जास्त राहणार असतानाच महिला राखीव नसलेल्या जागांवरही महिलांनी उमेदवारी केली आहे. तब्बल ४९ जागांवर १४५ महिला उमेदवार रिंगणात आहेत. महापौरपद याआधीच इतर मागासवर्ग संवर्गातील महिलेसाठी राखीव असल्याने मनपामध्ये ‘महिलाराज’ कायम राहणार आहे.शासनाने महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षणाला मंजुरी दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील चित्र बदलले आहे. पूर्वी पुरूष मंडळींच्या या राजकारणात असलेल्या वर्चस्वाला या निर्णयाने सुरूंग लागला आहे. सध्या पुरूष मंडळीच घरातील महिला सदस्याच्या नावाने राजकारण करीत असली तरीही कालांतराने यातही बदल होणार हे निश्चित आहे.१९ प्रभागांमधील ७५ जागांपैकी अनुसुचीत जमाती प्रवर्गाच्या ५ जागांसाठी ३ महिला राखीव व २ पुरुष जागांसाठी, अनुसूचित जमातींकरीता आरक्षित असलेल्या ४ जागांमधून २ महिलांकरिता, मागास प्रवर्ग २० जागांमधून १० महिला राखीव तर सर्वसाधारण ४६ जागांमधून २३ महिला राखीवची सोडत काढण्यात आली आहे. म्हणजेच ७५ पैकी ३८ जागा महिला राखीव असून पुरूषांसाठी फक्त ३७ जागा आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक