शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव मनपा निवडणूक : मनपा निवडणुकीसाठी खासदार अधिवेशनातून घेणार रजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 11:40 IST

दोन आठवडे जळगावातच

ठळक मुद्देप्रत्येक प्रभागात उमेदवारासोबत लावणार हजेरी सर्वच पक्ष करीत आहेत जोरदार तयारी

जळगाव : मनपा निवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार ए.टी. पाटील देखील मैदानात उतरणार आहेत. त्यासाठी लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान १ आॅगस्टपर्यंत सुट्टी घेणार असल्याची माहिती खासदार ए.टी. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.महापालिका निवडणुकीसाठी माघारीच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले असून सर्वच पक्ष जोरदार तयारी करीत आहेत. त्यात या निवडणुकीत भाजपाची धुरा संभाळणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे अधिकाधिक वेळ जळगावात देत आहेत. सोबतच पालकमंत्री चंंद्रकांत पाटील यांचेदेखील दोन दौरे झाले असून या वेळी ‘१७ मजली’ भाजपाच्या ताब्यात खेचण्याचा पुरेपूर प्रयत्न होताना दिसत आहे. त्यात आता खासदारांच्या मतदारसंघातील ही एकमेव महापालिका असल्याने खासदारदेखील या निवडणुकीत भाजपाच्या विजयासाठी जळगावात ठाण मांडून बसणार आहेत.या संदर्भात स्वत: खासदार पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, बुधवारपासून लोकसभेचे अधिवेशन सुरू होत असून त्यात ३१ महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होणार आहे. असे असले तरी आपल्या मतदार संघात महापालिका निवडणूक असल्याने तसे पत्र संसदीय कामकाज मंत्र्यांना देऊन सुट्टी घेणार आहे. त्यासाठी दिल्लीला जात असून सुट्टीची परवानगी मिळताच जळगावात येऊन प्रचारात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रत्येक प्रभागात फिरणारभाजपाच्या प्रत्येक उमेवारासोबत त्यांच्या प्रभागात फिरुन आपण प्रचार करणार असल्याची माहिती खासदार पाटील यांनी दिली. सभांना देखील उपस्थित राहणार असून पक्षाकडून जी जबाबदारी दिली जाईल, ती आपण पार पाडणार असल्याचे खासदार पाटील म्हणाले.

 

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव