शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

जळगाव महापालिका निवडणूक : पावसाळी अधिवेशन संपल्याने आता धडाडणार प्रचाराच्या तोफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 13:16 IST

प्रदेश नेतेही उतरणार मैदानात

ठळक मुद्दे मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे यांच्या सभांचे नियोजनसभा व प्रचार रॅलीत सहभागी होणार

जळगाव : मनपा निवडणुकीसाठी अवघे ८ दिवस शिल्लक आहेत.माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या व्यतिरिक्त इतर मोठे नेते प्रचार रॅलींमध्ये उतरलेले दिसून येत नाही. दरम्यान, विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संपल्यामुळे आता खऱ्या अर्थाने महापालिकेच्या प्रचाराला वेग येणार असून राज्यातील दिग्गज नेत्यांच्या तोफा आता धडाडणार आहेत.विधानसभेचे अधिवेशन संपल्यामुळे सर्वच पक्षातील राज्यपातळीवरचे नेते देखील आता मनपा निवडणुकीसाठी उपलब्ध होणार आहेत. शिवसेनेने आधीच आपल्या २० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून, भाजपा, राष्टÑवादी कॉँग्रेस व कॉँग्रेसचे वरिष्ठ नेते देखील महापालिकेत सभा व प्रचार रॅलीत सहभागी होणार आहेत.शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, डॉ.अमोल कोल्हे, नितीन बानगुडे-पाटलांच्या सभेचे नियोजनशिवसेनेतर्फेयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, डॉ.अमोल कोल्हे, आदेश बांदेकर, नितीन बानगुडे-पाटील यांच्या सभांचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी दिली. त्यांच्यासह सहकारराज्यमंत्री गुलाबराव पाटील हे देखील आता मनपा निवडणुकीसाठी शहरातच तळ ठोकणार असून, तेही काही भागात जाहीर सभा घेणार आहेत. तर हभप ज्ञानेश्वर महाराज हे देखील सभा घेणार आहेत. त्यांच्यासह माजी मंत्री सुरेशदादा जैन हे देखील प्रचारात स्वत: उतरल्यामुळे शिवसैनिकांचा उत्साह वाढला आहे.एकनाथराव खडसेंच्या आगमनाची प्रतीक्षाविधानसभेचे अधिवेशन व मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक आता संपल्यामुळे माजी मंत्री एकनाथराव खडसे मंगळवारपासून महापालिकेसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचारात उतरणार असल्याचे आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले. भाजपा कार्यकर्त्यांना देखील त्यांच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलपसंपदा गिरीश महाजन, शिक्षण मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्यासह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सभा देखील होणार आहेत.मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी प्रयत्नशिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सभेसाठी प्रयत्न सुरु असून, भाजपाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे नियोजन देखील करण्यात येतआहे. अद्याप मुख्यमंत्री कार्यालयाकडून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.कॉँग्रेस, राष्टÑवादीकडूनही सभांचे नियोजनकॉँग्रेस व राष्टÑवादी कॉँग्रेसकडून देखील राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभांचे नियोजन सुरु असून, माजी मुख्यमंत्री तथा कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आमदार भाई जगताप यांच्यासह काही नेत्यांच्या सभांसाठी कॉँग्रेस प्रयत्नशील आहे. तर राष्टÑवादीकाँग्रेसचे नेते,माजीउपमुख्यमंत्री अजित पवार, माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे हे नेते देखील महापालिकेच्या रणधुमाळीत उतरणार आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव