शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव मनपा निवडणूक : मुंबई, पुण्यातील मतदारांसाठी उमेदवारांकडून आराम बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 12:57 IST

मते आपल्या पारडण्यात पडण्यासाठी धडपड

ठळक मुद्दे३१ जुलैला सकाळी व रात्री येण्याची व्यवस्थामतदानाची टक्केवारी वाढणार

अजय पाटीलजळगाव : मनपा निवडणुकीत भाजपा व शिवसेनेमध्ये मोठी चुरस आहे. १२ ठिकाणी भाजपा व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत असून अनेक ठिकाणी तिरंगी लढत रंगणार आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवारासाठी एक-एक मत महत्वाचे ठरणार आहे. १ आॅगस्ट रोजी होणाऱ्या मतदानासाठी जे मतदार मुंबई, पुण्याला स्थायिक आहेत. त्यांच्यासाठी उमेदवारांनी आतापासूनच खाजगी आराम बसेसची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने शहरातील सुमारे १० हजारहून अधिक मतदार हे मुंबई, पुणे येथे सध्या स्थायिक आहेत. या मतदारांनी मनपा निवडणुकीसाठी मतदान करावे यासाठी प्रत्येक उमेदवाराने आपल्या प्रभागातील अशा मतदारांची स्वतंत्र यादी तयार केली आहे. उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून अशा मतदारांशी मोबाईलव्दारे संपर्क साधला जात असून, त्यांच्या सोईने येण्या-जाण्याची व्यवस्था करुन दिली जात आहेत.मतदानाची टक्केवारी वाढणारबाहेरच्या शहरांमध्ये राहत असलेल्या १० हजारहून अधिक मतदारांना मतदानाचा हक्क बजावला तर याचा फायदा उमेदवारांना जरी होणार असला तरी यामुळे मतदानाचा टक्का देखील वाढणार आहे. मात्र उमेदवारांकडून वाहनांवर होणाºया खर्चाकडे निवडणूक खर्च विभागाचे लक्ष आहे.३१ जुलैला सकाळी व रात्री येण्याची व्यवस्था१ आॅगस्टला मतदान असल्याने मुंबई व पुण्याहून सकाळी व सायंकाळी खाजगी आराम बसेस जळगावकडे येणार आहेत. त्यानंतर १ आॅगस्टला ज्या मतदारांना मतदान करून रवाना व्हायचे आहे. त्यांच्यासाठी देखील खाजगी आराम बसेस बुकींग करण्यात आली आहे. ज्या मतदारांना काही दिवस शहरात थांबायचे अशा मतदारांना प्रवासाचे भाडे दिले जाणार आहे. मुंबई, पुणे व्यतिरीक्त सूरत, नाशिक किं वा इतर शहरात राहणाºया मतदारांशी संपर्क साधून त्यांना रेल्वेचे तिकीट काढून दिले जात आहे. तर जवळपासच्या शहरांमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये राहणाºया मतदारांना मतदानाच्या दिवशी आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली जाणार आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव