जळगाव : मनपा निवडणुकीत हौशे-नवशे नशिब आजमावत असतानाच महापौरपद भूषविलेले ६ तर नगराध्यक्षपद भूषविलेले ४ जण रिंगणात आहेत.मनपा निवडणुकीत यंदा बदललेल्या प्रभाग रचनेमुळे प्रभागाचा आकार प्रचंड मोठा झाला असून मतदार संख्याही दुप्पट झाली आहे. तसेच एका प्रभागात चार उमेदवार रिंगणात आहेत.त्यामुळे यंदा निवडणुकीचे गणितच बदलले आहे.प्रचाराची यंत्रणा नसलेल्या नवीन उमेदवारांना निवडणूकीचा प्रचार करणे त्रासदायक होत आहे. त्या तुलनेत अनुभवी उमेदवारांना मात्र प्रचाराची पद्धत व यंत्रणा माहिती असल्याने प्रचार करणे सोपे जात आहेत.अशा परिस्थितीत महापौरपद भूषविलेले ६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात सदाशिवराव ढेकळे, जयश्री धांडे, विष्णू भंगाळे, राखी सोनवणे, नितीन लढ्ढा, ललित कोल्हे यांचा समावेश आहे. ढेकळे यांनी नगराध्यक्षपदही भूषविलेले आहे. त्यापैकी ढेकळे व ललित कोल्हे यंदा भाजपाकडून रिंगणात आहेत.तर नगराध्यक्षपद भूषविलेले ४ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात लता भोईटे, सिंधूताई कोल्हे, पुष्पा पाटील, शिवचरण ढंढोरे यांचा समावेश आहे. त्यापैकी भोईटे व कोल्हे भाजपाकडून निवडणूक लढवित आहेत.
जळगाव मनपा निवडणूक : ६ माजी महापौर, ४ माजी नगराध्यक्ष रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 13:05 IST
मनपा निवडणुकीत हौशे-नवशे नशिब आजमावत असतानाच महापौरपद भूषविलेले ६ तर नगराध्यक्षपद भूषविलेले ४ जण रिंगणात आहेत.
जळगाव मनपा निवडणूक : ६ माजी महापौर, ४ माजी नगराध्यक्ष रिंगणात
ठळक मुद्देप्रभाग रचनेचा आकार झाला मोठाएका प्रभागात चार उमेदवार रिंगणातयंदा निवडणुकीचे गणित बदलले