हगणदरीमुक्तीत जळगाव मनपा ‘नापास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 11:52 AM2017-09-03T11:52:40+5:302017-09-03T12:11:39+5:30

‘परीक्षा’पूर्वीचा निकाल : उघडय़ावर बसणे सुरुच, गुडमॉर्निग पथके नावालाच

Jalgaon Municipal Corporation work fail | हगणदरीमुक्तीत जळगाव मनपा ‘नापास’

हगणदरीमुक्तीत जळगाव मनपा ‘नापास’

Next
ठळक मुद्देउपाययोजना आवश्यकहगणदरीमुक्तीचा दावा फोल इशा:यानंतरही हगणदरी कायम

ऑनलाईन लोकमत / चंद्रशेखर जोशी

जळगाव, दि. 3 -   स्वच्छ भारत अभियानांतर्गत उघडय़ावर शौचास बसण्याची 58 पैकी सर्व ठिकाणे हगणदरीमुक्त झाली असून राज्याच्या समितीने परीक्षेसाठी केव्हाही शहरात यावे म्हणून महापालिकेने राज्य शासनाला पत्र दिले आहे. मात्र महापालिका प्रशासनाचा हा दावा कागदोपत्रीच असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.   नेहमीची ठिकाणे सोडून पर्यायी ठिकाणांवर गरीब वस्त्यांमधील नागरिक शौचास बसत असल्याचे या पाहणीत दिसल्याने परीक्षेपूर्वीच मनपा प्रशासन नापास झाले आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. 
स्वच्छ भारत अभियानाचा सर्वत्र गाजावाजा सुरू आहे. या पाश्र्वभूमीवरच राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविले जात आहे. यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या समितीतील अधिका:यांनी दोन वेळा शहरास भेट देऊन मनपा आरोग्य विभागाच्या कामकाजाविषयी तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत होत असलेल्या कामांविषयी नाराजी व्यक्त करून कडक समज दिली होती. 31 ऑगस्टपूर्वी काहीही करून  शहर हगणदरीमुक्त करा अन्यथा महापालिकेला मिळणारे सर्व शासकीय अनुदान बंद होईल असा इशारा या समितीचे प्रमुख तथा नगरविकास विभागाचे उपसचिव सुधाकर बोबडे यांनी दिला होता. त्यानंतर आरोग्य विभागात काही कर्मचा:यांच्या बदल्या करण्यात आल्या मात्र त्यानंतरही शहरात हगणदरी कायम आहे.

शहर हगणदरीमुक्त झाले की नाही? याबाबत ‘लोकमत’ चमूने शनिवारी सकाळी जुना असोदा रोड, याच परिसरातील मोहन टॉकीज समोरील मोकळी जागा, गुरूदत्त कॉलनी समोरील जागा, गोपाळपूरा येथील सार्वजनिक शौचालय, पांझरापोळ टाकी जवळील शौचालये, शिरसोली नाका पारख संकुलाच्या मागील भाग, समता नगरकडून कोल्हे हिल्सकडे जाणा:या रस्त्यावरील उंच भाग, शिवाजी उद्यानाकडून  मेहरूणकडच्या खदाणीकडील भागांना भेट दिली असता महापालिका प्रशासनाकडून केला जात असलेला हगणदरीमुक्तीचा दावा फोल ठरत असल्याचे दिसून आले. 

अशी आढळून आली परिस्थिती
जुना असोदा रोड मोहन टॉकीज जवळील मोकळ्या जागेत महिला दिवसादेखील शौचास जात असल्याचे दिसून आले. गुरूदत्त कॉलनीसमोरील मोकळ्या जागेतही रात्री नागरिक शौचास जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळाल्या. गोपाळपुरा भागात शौचालयाच्या पाण्याच्या कुंडाला गळती लागलेली होती. दरवाज्याला कडी कोयंडा नसल्याच्या तक्रारी समोर आल्या. पांझरापोळ टाकी जवळ नागरिक उघडय़ावर बसणे बंद झाले मात्र तेथील शौचालयाची दुरवस्था असल्याचे दिसून आले. महिलांचे 24 शौचकूप बंद असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. शिरसोली नाका पारख संकुलाच्या मागील भागात रात्री नागरिक शौचास बसत असल्याचे लक्षात आले. समतानगरकडे कोल्हे हिल्सकडे जाणा:या रस्त्यावर नागरिक शौचास बसत नाहीत मात्र समता नगरमागील डोंगर तसेच रस्त्याच्या दक्षिणेस असलेल्या उताराच्या जागेत नागरिक शौचास बसतात. तसेच सुरत रेल्वे गेट परिसरातील नाला, मोकळ्या जागा व शेतांमध्ये पुरुष व महिला शौचास बसतात. रेल्वेच्या मालधक्क्यावरही शौचविधी नागरिक करतात.
हगणदरीमुक्तीसाठी नियुक्त यंत्रणा अधिक सक्रीय करण्याची गरज आहे. काही काळ दिवसादेखील कर्मचारी असावेत. हगणदरीच्या पर्यायी जागांवरही लक्ष ठेवले जाणे गरजेचे असून सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती व सफाईची कामे नियमित होणेही गरजेचे आहे. 

काही सार्वजनिक शौचालयांच्या दुरूस्तीची कामे सुरू आहेत. नव्या ठिकाणांवरही गुडमॉर्निग पथके जातील अशी व्यवस्था करू. नागरिकांनीही जबाबदारी ओळखून उघडय़ावर शौचास बसू नये. 
-चंद्रकांत खोसे, उपायुक्त. 

Web Title: Jalgaon Municipal Corporation work fail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.