शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

जळगाव मनपाकडून आता रात्रीही राबविली जाईल अतिक्रमण मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 16:17 IST

शहरात महापालिकेने गेल्या महीन्याभरापासून अतिक्रमण मोहीम हातात घेतली आहे. आता महानगरपालिकेकडून रात्री देखील अतिक्रमण निर्मुलन मोहिम राबविली जाणार असून, १८ किंवा १९ तारखेपासून या मोहिमेस सुरुवात होण्याची शक्यता असल्याची माहिती अतिक्रमण निर्मुलन विभाग अधीक्षक एच.एम.खान यांनी दिली.

ठळक मुद्देतीन दिवस मनपाकडून दिल्या जातील सूचनाअतिक्रमण आढळल्यास केले जाईल नष्टस्टेशन परिसरातील २० हॉकर्सचे होणार स्थलांतर

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.१५-शहरात महापालिकेने गेल्या महीन्याभरापासून अतिक्रमण मोहीम हातात घेतली आहे. आता महानगरपालिकेकडून रात्री देखील अतिक्रमण निर्मुलन मोहिम राबविली जाणार असून, १८ किंवा १९ तारखेपासून या मोहिमेस सुरुवात होण्याची शक्यता असल्याची माहिती अतिक्रमण निर्मुलन विभाग अधीक्षक एच.एम.खान यांनी दिली.

महापालिकेने सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेदरम्यान अतिक्रमण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शहरतील वर्दळीच्या रस्त्यावरील तसेच नो हॉकर्स झोनमधील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जळगाव शहरात प्रभावपणे मध्यवर्ती बाजारपेठेत ही मोहीम राबविली जात असून, फुले मार्केट, बळीराम पेठ, सुभाष चौक व शिवाजी रोड या भागातील हॉकर्सवर दररोज महापालिकेच्या पथकाकडून कारवाई केली जात आहे. मात्र रात्रीच्या वेळी देखील शहरातील अनेक भागांमध्ये अतिक्रमणाचा विळखा पडल्याने अनेकदा वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो. त्यामुळे दिवसा सुरु असलेली मोहिम रात्री देखील राबविण्यात येणार आहे.  

२७ पथकांकडून केली जाईल कारवाईया मोहिमेसाठी अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून २७ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. मोहिमेत स्वत: अप्पर अ ायुक्त राजेश कानडे देखील सहभागी होणार आहेत. या मोहिमेआधी शहरातील मुख्य रस्त्यांवर दोन दिवस अतिक्रमण विभागाकडून सूचना देण्यात येणार आहे. अनेक स्टॉलधारक किंवा हातगाड्यांवर पदार्थ विक्री करणारे विक्रेते आपल्या हातगाड्या रस्त्यावरच उभे करून जातात. त्यामुळे अशा वाहने अतिक्रमण विभागाकडून नष्ट केली जाणार आहेत.

या भागात होणार कारवाईशहरातील नवीपेठ, अशोक टॉकीज गल्ली, फुले मार्केट, शहर पोलिस ठाण्याच्या बाजूची गल्ली, नेहरु चौक, खान्देश कॉम्पलेक्स, गोलाणी मार्केट, गांधी मार्केट, बळीराम पेठ या भागात रात्रीची अतिक्रमण मोहीम राबविण्यात येणार आहे.

स्टेशन परिसरातील २० हॉकर्सचे होणार स्थलांतरसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वेस्थानक परिसरातील १५० मीटर दरम्यान, नो हॉकर्स झोन निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील २० हॉकर्सचे मनपाककडून स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यांना जनता बँकेच्या मागील गल्लीत जागा देण्यात आली असून, २३ जानेवारीपासून ही प्रक्रीया करण्यात यणार असल्याची माहितीही एच.एम.खान यांनी दिली.