शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

टाईमस्लॉट अभावी जळगाव-मुंबई विमानसेवा अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 22:32 IST

शासनाचे दूर्लक्ष

ठळक मुद्दे२४ मार्चनंतरचे तिकिट मिळणेही बंद नागरिकांची गैरसोय विमानतळ प्राधिकरणचे अधिकारीही अनभिज्ञ

जळगाव : मुंबई विमानतळावरून जळगाव विमानसेवेसाठी टाईमस्लॉट उपलब्ध होण्यात अडचण येत असल्याने ‘उडान’ योजनेंतर्गत मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली जळगाव-मुंबई विमानसेवा अडचणीत आली आहे.केंद्र शासनाने जाहीर केलेल्या ‘उडान’ योजनेत नवे ४५ विमान मार्ग जाहीर करण्यात आले. यात महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचा समावेश असून जळगाव येथेही विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे जळगाव ते मुंबईचे अंतर केवळ ९० मिनिटात पूर्ण करता येत असल्याने उद्योजक, व्यापारी, अधिकारी तसेच नागरिकांसाठी ही सेवा मोठी उपलब्धी ठरत आहे. त्यामुळे ही विमान सुरू होण्याच्या आठवडाभर आधीच सुमारे आठवडाभराची तिकिटे फुल्ल झाली होती. मात्र जेमतेम महिनाभर ही विमानसेवा सुरळीत चालत नाही तोच मुंबई विमानतळावरून टाईम स्लॉट मिळत नसल्याने या विमानसेवेत अडथळा निर्माण व्हायला लागला. अखेर ३१ डिसेंबरपासून आठवडाभरातून केवळ ३ दिवसच ही विमानसेवा सुरू आहे.विमानतळ प्राधिकरणचेअधिकारीही अनभिज्ञकेवळ २४ मार्चपर्यंतचीच तिकिटीविक्री सुरू आहे. त्यानंतर विमानसेवा सुरू राहणार की नाही? याबाबत विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनाही माहिती नाही. एअरडेक्कनकडून याबाबत काहीही कळविण्यात आलेले नाही. तसेच पुणे किंवा अन्य शहरांना विमानसेवा सुरू करण्याबाबतही अद्याप काही हालचाल नसल्याचे विमानतळ प्राधिकरणाचे संचालक विकास चंद्रा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.२४ मार्चनंतरचे तिकिट मिळणेही बंदविमानसेवा पुरवित असलेल्या एअर डेक्कन कंपनीच्या वेबसाईटवर आॅनलाईन तिकिट बुकींगची सोय आहे. मात्र सध्या या वेबसाईटवर जळगाव-मुंबई विमानसेवेचे केवळ ३१ डिसेंबर ते २४ मार्चपर्यंतचेच वेळापत्रक लावण्यात आले असून या कालावधीतीलच विमानसेवेचे तिकीट विक्री होत आहे. २५ मार्चपासून पुढील तारखांना विमानसेवा बंदची सूचना दिसून येत आहे. कदाचित पुढील वेळापत्रक जाहीर झाल्यावर तिकीट विक्री सुरू होईल. मात्र याबाबत एअरडेक्कनच्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता या विषयावर पत्रकारांशी न बोलण्याच्या कंपनीच्या सूचना असून जनसंपर्क विभागाशी बोला, असे सांगत या विषयावर माहिती देणे टाळण्यात आले.