शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव - मुंबई विमानसेवेने पर्यटन व रोजगाराला मिळणार चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 13:18 IST

अजिंठा लेणी व लोणार सरोवरचा प्रवास होणार सुकर

ठळक मुद्देपरदेशातील पर्यटकांचीही होणार सोय‘जळगाव डेस्टीनेशन’विषयी जनजागृती व्हावी

विजयकुमार सैतवाल / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 20-  गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षा असलेल्या विमानसेवेला जळगावातून 23डिसेंबरपासूनअखेर सुरुवातहोतअसल्यानेयेथे विविध संधी उपलब्ध होऊ पाहत आहे. यामध्ये शहर व परिसरात असलेल्या पर्यटन, धार्मिक स्थळांचा प्रवाससुकर होणार असल्याने पर्यटन वाढून रोजगाराच्याही संधी निर्माण होण्याचे आश्वासक चित्र आहे. या सोबतच देशातील इतर पर्यटनस्थळीही जाणे सोयीचे होणार असल्याने देशांतर्गत पर्यटन वाढीस चालणा मिळणार आहे. जळगाव येथे 2010मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते विमानतळाचे उद्घाटन झाले. मात्र गेल्या सात वर्षापासून येथे विमानसेवा सुरू न झाल्याने शहरवासीयांना तेव्हापासून विमानसेवेची प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा संपून आता विमानसेवेचे स्वप्न 23 डिसेंबरपासून प्रत्यक्षात साकारणार असल्याने सर्वच क्षेत्रातील आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

पर्यटनवाढीस हवाईसेवेचा मोठा लाभज्या ठिकाणी विमानसेवा आहे, त्या परिसरातील पर्यटनस्थळांचा मोठय़ा प्रमाणात विकास होण्यासह रोजरागाच्याही संधी उपलब्ध झाल्याचे दिसून येते. जळगावपासून 150 कि.मी. अंतरावर असलेले औरंगाबाद हे याचे उत्तम उदाहरण आहे. याच धर्तीवर आता जळगावातही विमानसेवेमुळे  मोठय़ा संधी निर्माण होण्याचे सुखद चित्र आहे. 

अजिंठा, लोणारसाठी सोयीचा मार्गजागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणीला दरवर्षी भेट देणा:या पर्यटकांची संख्या लाखोमध्ये असते. यामध्ये जवळपास 40 टक्के विदेशी पर्यटक असतात. विदेशी पर्यटकांसह देशातील विविध भागातील (डोमेस्टीक) पर्यटक अजिंठा लेणी येथे येण्यासाठी मुंबई, उदयपूर, जयपूर अथवा इतर ठिकाणाहून विमानाने औरंगाबाद येथे येतात. तेथून त्यांना वाहनाने अजिंठा लेणीत यावे लागते. हे अंतर 100 कि.मी. आहे. जळगाव-मुंबई विमानसेवेमुळे पर्यटक मुंबईहून थेट जळगावला येऊन अजिंठा लेणी येथे गेल्यास त्यांचे वाहनाने प्रवासाचे अंतर निम्म्यावर येऊन त्यांचा वेळही वाचू शकतो. जळगाव ते अजिंठा लेणी केवळ 55 कि.मी. अंतर असल्याने साधारण पाऊण तासात पर्यटक जळगावहून तेथे पोहचू शकतात. अजिंठा लेणी पाहून तेथून पर्यटकांना  लोणार सरोवर, वेरुळ लेणीला जाता येऊ शकते व तेथून औरंगाबाद परिसरातील पर्यटन स्थळास भेट देत तेथूनच विमानाने जाणे योयीचे ठरू शकते.  त्यामुळे अजिंठा लेणी, लोणार सरोवर, वेरुळ लेणी येथे जाणारे पर्यटक जळगावातून गेले तर पर्यटकांचा वेळ वाचू शकतो, असा सूर उमटत आहे.

आंतरराष्ट्रीय ख्यातीेच्या गांधी तीर्थला पसंतीजळगाव येथे जैन हिल्स परिसरात उभारण्यात आलेल्या गांधी तीर्थ या पर्यटनस्थळासदेखील पर्यटक मोठय़ा प्रमाणात भेट देत असतात. महात्मा गांधी यांचे जीवनदर्शन घडविणा:या गांधी तीर्थला भेट देण्यासाठी देशभरासह विदेशातूनही पर्यटक येत असतात. विमानसेवेमुळे या पर्यटकांचा वेळ वाचून ते जळगाव जिल्ह्यातील पद्मालय या धार्मिक स्थळी तसेच जळगाव  शहरातील आर्यन पार्क येथे भेट देऊ शकतात व या सर्व ठिकाणी पर्यटनास चालना मिळेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. 

रोजगाराच्या संधी वाढणारपर्यटक जळगावात येण्यास सुरुवात झाली तर त्यांना येथे राहण्याची सोय व्हावी म्हणून हॉटेल्स, लॉज सरसावतील. यासोबतच अनेकांच्या हाताला काम मिळेल. या शिवाय वाहन, प्रशिक्षित चालक यांनाही मागणी वाढून त्यांच्या हाताला काम मिळू शकेल. एकूणच सर्वच क्षेत्रात भरभराट येऊन व्यवसाय वाढीस चांगला वाव असल्याचेही सांगितले जात आहे.  

देशांतर्गत पर्यटन वाढणारजळगाव येथून काश्मीर, राजस्थान, दक्षिण भारत तसेच देशातील बहुतांश धार्मिक स्थळी तसेच विदेशात पर्यटनास जाणा:या पर्यटकांचीही संख्या मोठी आहे. त्यासाठी ते येथून मुंबईत गेले व तेथून ‘कनेक्टेड’ विमानसेवेने इच्छित स्थळी कमी वेळात पोहचूून व तेथून याच मार्गाने परत येण्यास मदत मिळेल. यातून सर्वाचा वेळ, श्रम वाचू शकणार आहे. 

‘जळगाव डेस्टीनेशन’विषयी जनजागृती व्हावीजळगाव परिसरात असलेल्या या पर्यटन, धार्मिक स्थळांविषयी माहिती व्हावी यासाठी जळगाव विमानतळासह मुंबई विमानतळावरही या विषयी डिजिटल काउंटरची सोय करण्यात येऊन जनजागृती करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

विमानसेवेमुळे पर्यटन वाढीस मोठी संधी आहे. यामुळे आता पर्यटक इकडे येण्यास सुरुवात होऊन रोजगाराच्याही संधी वाढतील. त्यामुळे विमानसेवेचा अधिकाधिक लाभ घेतल्यास जळगावात व्यवसाय वाढीस मोठी संधी आहे. - समीर देशमुख, पर्यटन व्यावसायिक.