शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव कृषी बाजार समिती वादाची होणार चौकशी, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 12:22 IST

एकनाथराव खडसे यांची हस्तक्षेपाची मागणी

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीची पाडलेली भिंत बांधून देण्यासंदर्भात व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदचे पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले. माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानसभेत यासंदर्भात सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी केल्यानंतर बंद बाबत माहिती घेऊन याबाबत तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे़ दरम्यान, दुसरीकडे जळगावात मात्र, व्यापाऱ्यांनी बंदवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे़व्यापारी संकुलासाठी ८ जूनच्या पहाटेच कृषी उत्पन्न बाजार समितीची सुमारे तीनशे मीटर लांब असलेली संरक्षण भिंत विकासकाने जमिनदोस्त केली होती़ कुठलीही परवानगी नसताना ही भिंत जमिनदोस्त करण्यात आल्यामुळे आमचा माल उघड्यावर आला आहे, त्यामुळे ही भिंत बांधून द्यावी, अशी मागणी करी आडत असोसिएशनच्या माध्यमातून बंद पुकारण्यात आला होता़ पाच दिवसांच्या आश्वासनाने हा बंद मागे घेण्यात आला, मात्र, तरीही भिंत बांधली जात नसल्याने व्यापाºयांनी १७ जूनपासून बेमुदत बंद पुकारला आहे़काय म्हणाले एकनाथराव खडसेव्यापाºयांनी बंद पुकारल्यामुळे बाजार समितीतील काम ठप्प आहे़ तेथे नियमबाह्य काम केले जातेय म्हणून व्यापाºयांनी तो बंद पुकारला आहे़ त्यामुळे शेतकºयांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे़ भाजीपाला महाग झाला आहे़ अनेक दिवसांपासून हा बंद असल्याने शेतकºयांना मोठ्या अडचणी आलेल्या आहेत़ जे नियमात, कायद्यात बसत असेल त्याची तपासणी करून हा व्यवहार सुरळीत करावा व सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे व्यवहार पूवर्वत होण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने मदत करावी, अशी मागणी खडसे यांनी केली़ यावर बंद बाबत माहिती घेऊन तो मागे घेण्यासंदर्भात व तक्रारीबाबत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव