शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

जळगावात महामार्गाने घेतला पुन्हा दुचाकीस्वाराचा बळी, १३ दिवसात दुसरी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 13:06 IST

खोटे नगरजवळ दुचाकीस्वारला चिरडले

जळगाव : खड्डेमय राष्टÑीय महामार्ग व खराब साईडपट्टयाने शुक्रवारी पुन्हा शहरात एका दुचाकीस्वाराचा बळी घेतला. कंपनीतून घरी जात असलेल्या अनिल वसंत पाटील (५७, रा.नारायण नगर, बिबा नगर, जळगाव, मूळ रा.चितोडा, ता. यावल) या दुचाकीस्वाराला मागून आलेल्या डंपरने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता खोटे नगराजवळ झाला.दरम्यान, याच ठिकाणापासून काही अंतरावर ८ फेबु्रवारी रोजी सायंकाळी गायत्री समाधान पाटील (२७, रा़पिंप्राळा) या महिलेलाही अज्ञात वाहनाने उडविले होते. त्यात त्यांचीही मृत्यू झाला होता. १३ दिवसात त्याच ठिकाणावर हा दुसरा बळी आहे.अनिल पाटील हे एमआयडीसीत कंपनीत कामाला होते. शुक्रवारी सायंकाळी ड्युटी संपल्यानंतर दुचाकीने (क्र.एम.एच.१९ ए. एन. २६९७) घरी जात असताना खोटे नगरानजीक उताराजवळ मागून येणाऱ्या डंपरचा (क्र.एम.एच.१९ झेड. ५७५६) दुचाकीला कट लागला, त्यात खराब साईडपट्टीमुळे पाटील यांची दुचाकी रस्त्याच्याकडेला खड्डयात तर पाटील रस्त्यावर पडले. त्यामुळे डंपरचे चाक त्यांच्या डोक्यावरुन गेले. अपघातानंतर डंपर चालक फरार झाला. शहर वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक दिलीप पाटील, योगेश पाटील तसेच उमेश भांडारकर व सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केलीगल्लीतील तरुणांनी ओळखला मृतदेहया अपघातानंतर मृतदेह जागेवर पडून असल्याने ओळख पटत नव्हती. त्याचवेळी बिबा नगरातील योगेश बाविस्कर हा तरुण अपघाताच्या ठिकाणी आला. त्याने पाटील यांचा मृतदेह ओळखला आणि मित्र तसेच शेजारीच राहणारा गौतम गवई या तरुणाला फोन करुन पाटील यांच्या अपघाताची माहिती दिली. त्यानंतर पाटील यांचा मुलगा अजय व पत्नी ज्योती यांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेतून पाटील यांना जिल्हा रुग्णालयात आणले असता तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.पत्नी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिकाअनिल पाटील हे १५ वर्षापासून ते शहरातच वास्तव्याला होते. पत्नी ज्योती या शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका आहेत. मुलगा अजय व मुलगी जयश्री दोन्ही एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव