शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

जळगावचा पॉझिटिव्हिटी रेट ३.८३ टक्क्यांवर, राज्यात दुसऱ्यास्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:18 IST

जळगाव : १८ ते २४ मे या आठ‌वड्यात कोरोनाचे दोन हजार ५३ नवे रुग्ण आढळून आले, तर ५३ हजार ...

जळगाव : १८ ते २४ मे या आठ‌वड्यात कोरोनाचे दोन हजार ५३ नवे रुग्ण आढळून आले, तर ५३ हजार ६५१ चाचण्या करण्यात आल्या. या आठवड्यात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ३.८३ टक्के एवढा आहे. हा दर राज्यात दुसऱ्यास्थानी असल्याने जळगाव जिल्हा प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. यात पहिल्या स्थानावर भंडारा जिल्हा ३.४३ टक्क्यांसह आहे.

जळगाव जिल्ह्यात एप्रिल आणि मेच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. रुग्णसंख्या सातत्याने वाढत होती. रुग्णालयांमध्ये जागादेखील मिळत नव्हती. मात्र मे महिन्याच्या पंधरवड्यानंतर रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली. आता हळूहळू रुग्णसंख्या कमी होत आहे. एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात दररोज १ हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळून येत होते. मात्र नंतरच्या काळात ही संख्या कमी होऊ लागली. आता दररोजचे रुग्ण हे ३०० ते ४०० च्या आसपास येत आहेत. त्यामुळे रुग्णालयांमधील बेडदेखील रिकामे होऊ लागले आहेत. काही कोविड सेंटर रिकामी झाली, तर काहींनी आपले कोविड सेंटर बंद करून टाकले आहे.

प्रशासनाच्या आकडेवारीत मोठा फरक

जळगाव जिल्हा प्रशासनाने ट्वीटरवर बुधवारी दुपारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा ३.८३ टक्के एवढा आहे. राज्यात फक्त भंडारा जिल्हाच जळगावच्या पुढे आहे. मात्र ही आकडेवारी किती खरी मानावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाच्या ॲपवरून एकत्रित केलेली माहिती जिल्हा प्रशासनाने ट्वीट करून प्रसिद्ध केली आणि स्वत:ची पाठ थोपटून घेतली. मात्र जिल्हा शल्यचिकित्सकांनी दररोज प्रसिद्ध केलेली आकडेवारी आणि बुधवारी ट्वीटरवर प्रसिद्ध केलेली आकडेवारी ही जुळत नाही. यात शासनाच्या पोर्टलवर अपडेट न झाल्याने आकडेवारीत मोठा फरक दिसून येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यातून जिल्हा प्रशासन कोरोनाचे आकडे लपवत आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्य शासनाच्या ॲपवरील डेटा आणि जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेली माहिती यात फरक असू शकतो. दररोज जी माहिती आम्ही प्रसिद्ध करतो, ती आम्हाला मेलवर आलेली असते, तर आठवडाभराची एकत्रित माहिती ही शासनाच्या ॲपवरून आलेली असते. ती काही वेळा अपडेट झालेली नसते. मात्र ही माहितीदेखील पुढील एक-दोन दिवसात अपडेट केली जाते.

- डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक.

तारीख, बुधवारी जाहीर केलेले कोरोना रुग्ण, दररोजचे कोरोना रुग्ण (अनुक्रमे)

१८ मे ४०१ - ५२१

१९ मे ३९१ - ४९४

२० मे ४३१ - ३५७

२१ मे ४२२ - ४१०

२२ मे १५८ - ४०५

२३ मे ८६ - ३६२

२४ मे १६४ - ३१२