शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: आठवडाभरात सोने अडीच हजार रुपयांनी वधारले, चांदीतही पाच हजार रुपयांची वाढ

By विजय.सैतवाल | Updated: March 17, 2023 16:10 IST

Jalgaon: गेल्या महिन्यात ५६ ते ५७ हजार रुपयांदरम्यान असलेले सोन्याचे भाव शुक्रवार, १७ मार्च रोजी ५८ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहेत. आठवडाभरात तर सोन्याच्या भावात दोन हजार ५०० रुपयांची वाढ झाली आहे.

- विजयकुमार सैतवालजळगाव : गेल्या महिन्यात ५६ ते ५७ हजार रुपयांदरम्यान असलेले सोन्याचे भाव शुक्रवार, १७ मार्च रोजी ५८ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहेत. आठवडाभरात तर सोन्याच्या भावात दोन हजार ५०० रुपयांची वाढ झाली आहे. चांदीदेखील आठवडाभरात पाच हजार २०० रुपयांनी वधारून ती ६७ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली आहे.

गेल्या महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी २ फेब्रुवारी रोजी सोने ५९ हजार १५० रुपये प्रति तोळा तर चांदी ७१ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली होती. त्यानंतर मात्र हे भाव कमी-कमी होत गेले. त्यामुळे सोने ५६ ते ५७ हजार दरम्यान राहिले तर चांदी ६४ ते ६६ हजार दरम्यान होती. मात्र गेल्या आठवड्यापासून सोने-चांदीत भाववाढ होऊ लागली आहे.

गेल्या आठवड्यात १० मार्च रोजी ५६ हजार रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात ११ रोजी ९०० रुपयांची वाढ झाली. त्यानंतर १३ रोजी पुन्हा ३०० रुपयांची वाढ होण्यासह १४ रोजी पुन्हा ९०० रुपयांची वाढ झाली व सोने ५८ हजार १०० रुपयांवर पोहचले. त्यानंतर ही वाढ  कायम राहत १७ मार्च रोजी सोने ५८ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले.

अशाच प्रकारे १० मार्च रोजी ६२ हजार ३०० रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात ११ रोजी एक हजार ४०० रुपयांची वाढ होऊन ती ६३ हजार ७०० रुपयांवर पोहचली. १३ रोजी पुन्हा ५०० रुपयांची वाढ झाली व चांदी ६४ हजार २०० रुपयांवर पोहचली. १४ रोजी तर थेट तीन हजार १०० रुपयांची वाढ होऊन चांदी ६७ हजार ३०० रुपयांवर पोहचली. ही वाढ कायम राहत १७ रोजी ती ६७ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली. कमोडीटी बाजारात सोने-चांदीची अचानक मागणी वाढल्याने ही भाववाढ होत असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :GoldसोनंSilverचांदी