शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव घरकूल प्रकरण : दहा आरोपींवर वेगवेगळ्या वॉर्डात उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 12:11 IST

महिला जाणार आज उच्च न्यायालयात, ३८ जण कारागृहात

जळगाव/धुळे : जळगाव घरकुल प्रकरणात शिक्षा झालेल्या ४८ पैकी १० आरोपी हिरे वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात वेगवेगळ्या वॉर्डात उपचार घेत आहेत. तर सुरेशदादा जैन यांच्यासह ३८ आरोपी कारागृहात आहेत. दरम्यान, जामीन व निकालाच्याविरुध्द सर्व महिला आरोपी मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर ४ वर्ष शिक्षा झालेले व नंतर सात वर्ष शिक्षा झालेले आरोपी उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी महापौर सदाशिव ढेकळे, शिवचरण ढंढोरे, विजय कोल्हे, दत्तू देवराम कोळी, लता भोईटे, अलका भोईटे, साधना कोगटा, मिना वाणी व सुधा काळे हे रुग्णालयात दाखल झाले आहेत. प्रत्येक वॉर्डात आरोपींसाठी स्वतंत्र बंदोबस्त देण्यात आलेला आहे़ सुरेशदादा जैन यांच्यासह ३८ जण कारागृहात आहेत.जळगाव घरकूल घोटाळा प्रकरणी धुळे येथील विशेष न्यायाधीश डॉ़ सृष्टी नीळकंठ यांनी गुन्ह्यातील सर्व ४८ जणांना दोषी धरुन शनिवारी वेगवेगळी शिक्षा सुनावली. या सर्वांना धुळे जिल्हा कारागृहात पाठविण्यात आले होते़ तत्पुर्वी या सर्वांची हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात तपासणी करण्यात आली होती़ त्यानंतर त्यांना कारागृहात पाठविण्यात आले़ तेथे १० जणांनी टप्प्या-टप्प्याने प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.देवकर व ढंडोरे वॉर्ड ३५ मध्ये दाखलरुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ३५ मध्ये शिवचरण ढंढोरे, गुलाबराव देवकर आणि सदाशिव ढेकळे यांच्यावर उपचार सुरु आहेत़ विजय कोल्हे यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना वॉर्ड क्रमांक १७ मध्ये ठेवण्यात अले होते़ त्यानंतर त्यांना आता ३५ नंबरच्या वॉर्डात दाखल करण्यात आले आहे़ त्यांनाही स्वतंत्र बंदोबस्त देण्यात आलेला आहे़ दत्तू देवराम कोळी यांना तर न्यायालयाच्या आदेशानेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ या ठिकाणच्या वॉर्ड क्रमांक १२ मध्ये त्यांना ठेवण्यात आले असून स्वतंत्र बंदोबस्त देण्यात आलेला आहे़ त्याचप्रमाणे रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक ३३ मध्ये पाच महिलांवर उपचार सुरु आहेत़ त्यात लता भोईटे, अलका लढ्ढा, साधना कोगटा, मिना वाणी आणि सुधा काळे यांचा समावेश आहे़ या पाच महिला आरोपींसाठी स्वतंत्र बंदोबस्त देण्यात आला आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव