शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

जऴगाव : शासनाची वाट न पाहता शेतक-यांनी केला स्वखर्चाने रस्ता दुरुस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 13:55 IST

चाळीसगाव : लालफितीच्या कारभारावर वर्गणी करुन केली मात

विजय पाटील /चाळीसगाव (जि. जळगाव) - गाव आणि परिसराच्या विकासासाठी शासनावर अवलंबून न राहता गावक-यांनीच पुढाकार घेऊन जवळपास तीन किलोमीटरचा रस्ता दुरुस्त केला. उंबरखेड- दडापिंप्री (ता. चाळीसगाव) येथील शेतक-यांनी वर्गणी करुन लालफितीच्या कारभारावर मात केली आहे. चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड हे आठ हजार लोकसंख्येचे गाव. या गावापासून दडपिंप्री हे जवळचे गाव. पण दोन्ही गावे जवळ असूनही रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची दुरवस्था. अनेक वेळा अर्जफाटे करुन शासकीय यंत्रणा हालचाल करण्यास तयार नव्हती. शेवटी परिसरातील शेतक-यांनाच यासाठी वर्गणी करण्याची वेळ आली.

उंबरखेड-दडपिंप्री रस्त्यावर ब-याच वर्षापासून खडी टाकून ठेवण्यात आली होती. मोठमोठे खड्डे पडलेले. उंबरखेड गावात प्राथमिक आरोग्य केंद्र, हायस्कूल, कॉलेज, बँक शाखा आहेत. गावापासून जवळच असलेल्या दडापिंप्री, चिंचखेडे इथल्या लोकांचा उंबरखेडशी संबंध येतो.दडापिंप्री आणि चिंचखेडे येथे रात्री कुणी आजारी पडले तर त्याला आरोग्य केंद्रापर्यंत आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. शिवाय कॉलेज, हायस्कूलमध्ये जाणा-या विद्याथ्याचे तर हाल होत होते. सायकल सोडाच साधे पायीदेखील या रस्त्यावरून चालता येत नव्हते. तसेच या रस्त्याला अनेक शेतशिवार, रस्ते जोडले जोडण्यात आले आहेत. या रस्त्यावरून शेतमाल घेऊन जाणे हे एक कठीण काम झाले होते.

आता साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. उंबरखेड-दडपिंप्री-चिंचखेडे येथील शेतक-यांनी ऊसाची लागगड केली आहे. रस्त्याची स्थिती बिकट असल्याने ऊसाची वाहतूक करता येत नव्हती आणि वाहनचालकही शेतापर्यंत वाहन आणण्यास तयार नव्हते.लोकप्रतिनिधी तसेच संबंधित विभागाला कळवून देखील दुर्लक्ष केले जात होते. यावर शेतक-यांनीच उपाय शोधून काढला. चिंचखेडे, दडपिंप्री येथील काही शेतक-यांनी जेसीबी लावून स्वखर्चाने रस्ता दुरुस्त केला. याकामी शेतकरी विजय ठाणसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली ओंकार पवार, अशोक जाधव, सुदाम राठोड, विकास राठोड, संजय राठोड, कैलास पाटील, संजय पवार, धनराज पाटील या शेतकºयांनी पुढाकार घेतला.

रस्त्याची स्थिती खराब असल्याने कुणीही वाहनधारक या रस्त्याने येण्यास तयार होईना, परिणामी दडापिंप्री येथील अनेक शेतकºयांचा माल शेतातच पडून होता. शासनाची वाट किती दिवस पहायची. त्यामुळे आम्ही शेतकºयांनी वर्गणी केली. मुरुम टाकून रस्त्यावरील खड्डे बुजले आणि रस्त्यावर वाढलेली झाडेझुडपेही काढली. आता रस्ता वाहने येण्या-जाण्या योग्य झाला आहे. याचा आम्हाला आणि गावालाही फायदा झाला आहे. - विजय ठाणसिंग पाटील, आडगाव ता. चाळीसगाव.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा