शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon Election जळगावातील ‘त्या’ उमेदवारांच्या घरी धडकल्या महिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 14:18 IST

मतदान झाल्यानंतर प्रत्येक महिलेला एक हजार रुपये देण्याचे कबुल करुनही ‘टोकन’ची रक्कम न दिल्याने प्रभाग १६ मधील महिलांनी उमेदवाराच्या घरी जावून शिव्यांची लाखोली वाहिल्याची घटना मतदानाच्या दिवशी घडली होती, दरम्यान रविवारी ५ रोजी पुन्हा त्याच प्रभागात व उमेदवारांकडे महिलांनी पैशासाठी धडक दिल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्देजळगावातील प्रभाग १६ मधील प्रकारटोकनचे पैसे मागितल्याची चर्चाशिविगाळ व प्रचंड गर्दी झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल

जळगाव : मतदान झाल्यानंतर प्रत्येक महिलेला एक हजार रुपये देण्याचे कबुल करुनही ‘टोकन’ची रक्कम न दिल्याने प्रभाग १६ मधील महिलांनी उमेदवाराच्या घरी जावून शिव्यांची लाखोली वाहिल्याची घटना मतदानाच्या दिवशी घडली होती, दरम्यान रविवारी ५ रोजी पुन्हा त्याच प्रभागात व उमेदवारांकडे महिलांनी पैशासाठी धडक दिल्याचे सांगितले जाते. प्रचंड गर्दी व संभाव्य वाद लक्षात घेता या उमेदवाराने पोलिसांनाच पाचारण केले आणि त्यांनतर ही गर्दी पांगली.याबाबत घटना स्थळावर काहींनी दिलेल्या माहिती नुसार वृत्त असे की, प्रभाग १६ मध्ये मतदानाच्या दिवशी तेथील मतदार महिलांनी उमेदवार रेश्मा कुंदन काळे यांचे घरी घरी सायंकाळी धडक दिली होती. महिलांची संख्या पाहता उमेदवाराने घराचे दरवाजे बंद करुन घेतले होते. गर्दी कमी होतच नसल्याने या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांनाच पिटाळून लावल्याचा प्रकार घडला होता. चार दिवसानंतर या प्रभागातील महिलांनी रविवारी सायंकाळी पुन्हा या उमेदवाराचे घर गाठले. आता तरी ठरल्याप्रमाणे पैसे दे म्हणत पैशाची मागणी केली. हळूहळू करत चारशे ते पाचशे मतदार या उमेदवाराच्या घरी धडकल्यानंतर काहीही घटना घडू शकते याचा अंदाज आल्याने त्याने एमआयडीसी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांचे शासकीय वाहन आल्याचे पाहून काही जणांनी स्वत:हून काढता पाय घेतला तर काही जणांनी मात्र पोलिसांसमोर उमेदवाराकडे पैशाची मागणी केली. भररस्त्यावर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची गर्दी, त्यानंतर या महिलांची गर्दी वाढल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत होता. रविवारीही काही महिलांनी उमेदवाराला शिव्यांची लाखोली वाहत येथून काढता पाय घेतला. दरम्यान या प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.दुसऱ्या उमेदवाराकडेही गर्दीयाच प्रभागातील दुसरे उमेदवार भगत बालाणी या उमेदवाराकडे सकाळी त्यांच्या घराच्या परिसरातील काही मतदार पैशांची मागणी करण्यासाठी गेले होते. या उमेदवाराने काही जणांनी किंचीतशी रक्कम दिल्याची माहिती मिळाली. त्या उमेदवाराने पैसे दिले, मग तु का देत नाहीस असा जाब काही महिलांनी विचारला. या गल्लीत दोन उमेदवार राहतात.शुभेच्छा द्यायला लोक आल्याचे स्पष्टीकरण७-८ लोक पैसे मागण्यासाठी नव्हेत तर शुभेच्छा देण्यासाठी आले होते.मात्र विरोधकांनी आणखी लोक पाठवून घराजवळ गर्दी केली, असे काळे कुटुंबियांतर्फे ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. तर प्रकाश बालाणी यांनीही शुभेच्छा देणाºयांचीच गर्दी होती असे स्पष्ट केले. पैसे वाटपाचा इन्कार केला.

टॅग्स :Jalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूकElectionनिवडणूक