आॅनलाईन लोकमतजळगाव दि,११ : चोपडा तालुक्यातील चहार्डी येथे मित्राच्या बहिणीच्या हळदीला जात असताना गोरगावले-चोपडा रस्त्यावर वळण घेत असताना पाटाच्या भींतीला दुचाकी आदळल्याने छातीला मार लागून निलेश रामचंद्र कोळी (वय २०) हा तरुण ठार झाला तर गोलु राजेंद्र कोळी व प्रमोद उर्फ भैय्या किशोर कोळी (सर्व रा.भादली, ता.जळगाव) हे दोन्ही जखमी झाले आहे. शनिवारी रात्री साडे दहा वाजता हा अपघात झाला.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बळीराम भगवान सोनवणे (रा.भादली,ता.जळगाव, मुळ रा.टाकरखेडा, ता.एरंडोल) यांच्या मुलीचे रविवारी चहार्डी, ता.चोपडा येथे लग्न होते. शनिवारी हळद असल्याने निलेश, गोलु व प्रमोद हे तिन्ही जण एका दुचाकीने (क्र.एम.एच.१९ सी.पी.४७७९) रात्री नऊ वाजता घरुन निघाले. अन्य चार दुचाकीवर आठ ते दहा जण होते. ते या तिघांच्या पुढे गेले होते. बरेच अंतर पुढे आल्यावर निलेश अजून का आला नाही व फोनही लागत नसल्याने पुढे गेलेले त्याचे मित्र माघारी फिरले. गोरगावलेजवळ वळणावर पाटाच्या चारीत दुचाकीसह तिन्ही जण जखमी अवस्थेत आढळून आले.
जळगाव जिल्ह्यात पाटाच्या भींतीला दुचाकी आदळून तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 15:28 IST
चोपडा तालुक्यातील चहार्डी येथे मित्राच्या बहिणीच्या हळदीला जात असताना गोरगावले-चोपडा रस्त्यावर वळण घेत असताना पाटाच्या भींतीला दुचाकी आदळल्याने छातीला मार लागून निलेश रामचंद्र कोळी (वय २०) हा तरुण ठार झाला तर गोलु राजेंद्र कोळी व प्रमोद उर्फ भैय्या किशोर कोळी (सर्व रा.भादली, ता.जळगाव) हे दोन्ही जखमी झाले आहे. शनिवारी रात्री साडे दहा वाजता हा अपघात झाला.
जळगाव जिल्ह्यात पाटाच्या भींतीला दुचाकी आदळून तरुण ठार
ठळक मुद्देगोरगावलेजवळ अपघात गोरगावलेजवळ अपघात मित्राच्या बहिणीच्या हळदीला जाताना झाला अपघात