शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात घरफोडी करणारे दोन अट्टल चोरटे जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 22:38 IST

नाशिक उपनगरात वास्तव्य करुन जळगाव शहर, पाचोरा, भुसावळ या भागात घरफोडी करणाºया कुंदन उर्फ राहूल नाना पाटील (वय २५ रा. रामेश्वर, ता. अमळनेर) व गुरुदेव उर्फ पिंटू कृष्णाजी हेमणे (वय २४,रा.साकरा, ता.साकोली, जि.भंडारा) दोन्ही ह.मु.नाशिक या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळ येथून अटक केली. त्यांच्याकडून  १६ हजार रुपये रोख व मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे एलसीबीची कारवाई  नाशिकमध्ये वास्तव्य करुन जळगाव जिल्ह्यात घरफोड्या रोख रक्कम, मोबाईल हस्तगत

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१०: नाशिक उपनगरात वास्तव्य करुन जळगाव शहर, पाचोरा, भुसावळ या भागात घरफोडी करणाºया कुंदन उर्फ राहूल नाना पाटील (वय २५ रा. रामेश्वर, ता. अमळनेर) व गुरुदेव उर्फ पिंटू कृष्णाजी हेमणे (वय २४,रा.साकरा, ता.साकोली, जि.भंडारा) दोन्ही ह.मु.नाशिक या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळ येथून अटक केली. त्यांच्याकडून  १६ हजार रुपये रोख व मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.शहरातील इस्लामपुरा भागातील सालार मार्केटमधील खेळणीचे दुकान ९ मार्च रोजीच्या रात्री फोडून त्यातील २८ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेल्याचा प्रकार उघड झाला होता. त्याआधी ३१ जानेवारी रोजी पाचोरा शहरातील रामेश्वरीबाई अग्रवाल पतसंस्थेच्या कार्यालयातूनही १५ हजार ५०० रुपये चोरी झालेले होते. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास करीत भुसावळ रेल्वे स्थानकावर दोन संशयितांना रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने पकडल्याची माहिती हेडकॉन्स्टेबल रवींद्र पाटील यांना मिळाली. या संशयितांनी त्यांची नावे राहूल अशोक पाटील व कैलास हरी कुणबी अशी सांगून पोलिसांची दिशाभूल केली होती. रवींद्र पाटील यांना शंका आल्याने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना घटनेची माहिती दिली. कुराडे यांनी लागलीच रवींद्र पाटील, दीपक पाटील, शरीफ काझी,प्रकाश महाजन, इद्रीस पठाण सुभाष पाटील व गफूर तडवी यांचे पथक भुसावळला पाठविले.एलसीबीच्या चौकशी फुटले बींगया पथकाने दोघांना जळगावला आणले असता खाकी हिसका दाखविताच दोघांनी खरे नाव व पत्ते सांगितले. तसेच त्यांच्याजळील रोख रक्कम, मोबाईल काढून दिला. जळगाव, पाचोरा, शनी पेठ व भुसावळ येथे घरफोडी केल्याची कबुली त्यांनी दिली. जळगाव व भुसावळ रेल्वे स्थानकावर वास्तव्य करुन शहर व परिसरात घरफोडी केली जात असल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले.