शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

जळगाव जिल्ह्यात धो धो पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 23:24 IST

जळगाव : खान्देशात अवकाळी पाऊस थांबायला तयार नाही. दोन दिवसांपूर्वी दोन दिवसाची उघडीप सोडली तर सुमारे दहा दिवसांपासून पाऊस ...

जळगाव : खान्देशात अवकाळी पाऊस थांबायला तयार नाही. दोन दिवसांपूर्वी दोन दिवसाची उघडीप सोडली तर सुमारे दहा दिवसांपासून पाऊस सुरु आहे. शनिवारीही दिवसभर पाऊस सुरु होता. शुक्रवारी रात्री तर जळगाव जिल्ह्यात पावसाने कहरच केला. यामुळे नदी व नाल्यांना पूर आला आहे. चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली असून ६६ मीमी इतकी नोंद झाली आहे. गिरणा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धुळ्यात पावसाचा जोर कमी होता तर नंदुरबार जिल्ह्यात तुरळक पाऊस झाला.जळगाव जिल्ह्यात एकूण पावसाची शनिवारी ३६७ मीमी नोंद झाली. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील गिरणा व वाघूर या दोन मोठ्या धरणांचे क्रमश: ६ आणि वीस दरवाजे उघडले आहेत. जामनेर तालुक्यातील सुनसगाव येथे शुक्रवारी दुपारी नदीत वाहून गेलेला अतुल संजय पवार हा तरुण दुसऱ्या दिवशीही बेपत्ता होता.पूल तुटल्याने वाकोदचा संपर्क तुटलातर याच तालुक्यातील औरंगाबाद महामार्गालगतचा वाकोद जवळील गोसावीवाडीकडे जाणारा पूल तुटला आहे. यामुळे वाकोद गावाचा संपर्क तुटला आहे. तर औरंगाबाद - जळगाव वाहतूक शेजारील पर्यायी मार्गाने सुरु आहे. केवळ लांब अती अवजड वाहनांची वाहतूक ठप्प झाली आहे. ही वाहतूक थोडे काम केल्यावर रविवारी सुरु होण्याची शक्यता आाहे. दरम्यान अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचले आहे. चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव, जळगाव, पारोळा आदी गावांना या पावसाचा अधिक फटका बसला आहे.वरखेडीला शेतांमध्ये कंबरेएवढे पाणीवरखेडी येथे नदीचे पाणी शेतांमध्ये शिरले आहे. यामुळे शेतांमध्ये कंबरेएवढे पाणी साचले आहे.सागवीकरांनी सोडले गावजामनेर तालुक्यातील सांगवी येथे गोगडी धरण फुटल्याच्या अफवेने नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली होती. यामुळे अनेकांनी गाव सोडले मात्र भिती बाळगण्याचे कारण नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.पिंपळगाव हरे येथे घरांमध्ये शिरले पाणीबहुळा नदीला पूर आल्याने पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरे. येथे नदी पात्रालगत असलेल्या अण्णाभाऊ साठे नगर मध्ये रस्त्यावरून कंबरेबरोबर पाणी वाहत होते. काही घरांमध्येही पाणी घुसले.