शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

निम्मा पावसाळा उलटत आला तरी जळगाव जिल्ह्यात केवळ ३३ टक्केच पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 01:17 IST

चोपडा तालुक्यात केवळ २६ टक्के पाऊस

जळगाव : पावसाळ््याची दोन महिने संपत आली तरी जिल्ह्यात अद्यापपर्यंत केवळ ३३ टक्केच पाऊस झाला असून चोपडा तालुक्यात तर सर्वात कमी म्हणजेच २६.६ टक्केच पाऊस झाल्याने या तालुक्यात चिंता वाढविली आहे. जामनेर तालुक्यात मात्र वरुणराजाने कृपा दृष्टी केली असून तेथे ४६.६ टक्के पाऊस झाला असून तालुक्याची वाटचाल पन्नाशीकडे सुरू आहे. दरम्यान, शुक्रवार व शनिवारी झालेल्या दमदार पावसाने बळीराजा सुखावला असून त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.गेल्या वर्षी झालेल्या कमी पावसाच्या झळा सोसत असताना यंदाही निम्म्याहून अधिक जून महिना संपला तरी पाऊस न आल्याने बळीराजा चिंतातूर झाला. त्यानंतर पावसाने हजेरी लावली खरी मात्र मध्यंतरी ओढ दिल्याने सर्वांच्या चिंता वाढल्या.पावसाच्या मोठ्या खंडामुळे निम्मा पावासाळा उलटला तरी पावसाने चाळीशीदेखील गाठलेली नाही. गेल्या वर्षी २७ जुलै रोजी ३८.८ टक्के पाऊस झालेला असताना यंदा याच दिवसापर्यंत ३३.२ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षी पावसाअभावी पाण्यासाठी जे हाल झाले व पिकांनाही जो फटका बसला त्यापेक्षा यंदा जास्त हाल होण्यासह पिकांनाही अधिक फटका बसतो की काय अशी चिंता बळीराजाला लागली आहे.जामनेर तालुक्यात सर्वाधिक पाऊसजिल्ह्यात पावसाने चाळीशी गाठली नसताना जामनेर तालुक्यावर मात्र बळीराजाने कृपादृष्टी दाखविली आहे. २७ जुलै पर्यंत जामनेर तालुक्यात ४६.६ टक्के पाऊस झाला असून त्याखालोखाल एरंडोल तालुक्यात ४१.५ टक्के पाऊस झाला आहे. चोपडा तालुक्यात मात्र केवळ २६.६ टक्केच पाऊस झाला आहे.तालुकानिहाय झालेल्या पावसाची टक्केवारी (कंसात २७ रोजी झालेला पाऊस - मि.मी.मध्ये)जळगाव - २९.७ (३०.३), जामनेर ४६.६ (३२), एरंडोल ४१.५ (१९.५), धरणगाव ३२.८ (२४.९), भुसावळ ३१.९ (३५.३), यावल २७.१ (२६.०), रावेर २९.१ (२१.४), मुक्ताईनगर ३३.५ (२५.३), बोदवड ३१.९ (२०.३), पाचोरा ३९.९ (२३.६), चाळीसगाव ३१.४ (५.१), भडगाव २९.३ (१६.३), अमळनेर ३१.९ (१६.८), पारोळा ३४.२ (९.२), चोपडा २६.६ (३४.७), एकूण ३३.२ (३४०.५)तोंडापूर धरण १०० टक्के भरलेगेल्या २४ तासात तोंडापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढून धरण २७ रोजी सकाळी १०० टक्के भरले. सकाळी हे धरण ओसंडून वाहू लागले होते. गेल्या वर्षी २७ जुलै रोजी धरणात शून्य टक्के साठा होता. यांदा मात्र हे २७ रोजीच १०० टक्के भरल्याने परिसरातील गावांना दिलासा मिळाला आहे.इतर धरण साठ्यात फारसी वाढ नाहीदोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू असला तरी जिल्ह्यातील मोठ्या धरणांमध्ये फारसी वाढ झालेली नाही. यामध्ये गिरणा धरणात २६ रोजी ७.५२ टक्के पाणी साठा होता. तो २७ रोजीही तेवढाच होता. हतनूर धरणात २६ रोजी २२.४३ टक्के पाणीसाठी होता तो २७ रोजी २२.५५ टक्के झाला. वाघूर धरणात २६ रोजी २०.६० टक्के साठा होता तो २७ रोजी २०.९८ टक्के झाला. यामध्ये हतनूर धरण क्षेत्रात मध्यप्रदेशात मोठा पाऊस झाला असला तरी धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आल्याने पाणीसाठी वाढू शकला नाही.

टॅग्स :Jalgaonजळगाव