शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हयात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण 842 वरून 903वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 12:16 IST

जिल्हाधिकारी : बालिका सप्ताहाचा समारोप

ठळक मुद्दे बालिका सप्ताहाचा समारोपघोषवाक्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धांचे आयोजनलिंग गुणोत्तरात जळगावचा दुसरा क्रमांक

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 15 - देशात मुलींची संख्या दिवसेदिवस कमी होत चालली असताना जळगाव जिल्हयात मात्र मुलींच्या जन्मदराचे प्रमाण 842 वरून 903 इतके होणे गौरवास्पद असून आशा कर्मचारी व अंगणवाडी सेविकांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेच्या माध्यमातून चांगल्याप्रकारे जनजागृती केल्याने हे शक्य होत असल्याचे  गौरोवोद्गार जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी काढले. लिंगनिदान होवू नये यासाठी सोनोग्राफीचे कायदे कडक करण्यात आले आहे. यापुढेही सर्वांनी सामाजिक भावनेतून काम करुन समाजात जनजागृती करणे आवश्यक असल्याचेही आवाहन त्यांनी या वेळी केले.   ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेतंर्गत बालिका सप्ताहाचा समारोप  नियोजन भवनात जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्या उपस्थितीत झाला, यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महापौर ललित कोल्हे, आमदार सुरेश भोळे,  पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हा परिषदेचे उप मुख्यकारी अधिकारी तडवी, तहसीलदार अमोल निकम, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर, सरस्वती बागूल आदी उपस्थित होते.

निंबाळकर पुढे म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला असता 2015 मध्ये लिंग गुणोत्तरात जळगावचा दुसरा क्रमांक होता. त्यावेळी जिल्हयात 1 हजार मुलांच्या तुलनेत 842 मुली जन्माला येत होत्या. मात्र आता हे प्रमाण वाढल्याने जिल्ह्यासाठी ही गौरवाची बाब असल्याचे ते म्हणाले.  या योजनेची समाजात जनजागृती करुन मुलं-मुलींमधील लिंग गुणोत्तराचे प्रमाण वाढविण्यासाठी काम करणा:या अंगणवाडी सेविका व आशा कर्मचारी या सर्व समाजासाठी देवदूत असल्याचाही उल्लेख त्यांनी केला. 

आमदार सुरेश भोळे म्हणाले की, मुलगी वाचली तरच देश वाचेल या भावनेतून आपण सर्वजण  काम  करु या, असे आवाहन केले.9 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत बालिका सप्ताहा साजरा करण्यात आला. या सप्ताहामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेंतर्गत  प्रशासनातर्फे घोषवाक्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती  काटकर यांनी प्रास्ताविक भाषणात दिली. सुरुवातीस बेटी बचाओ बेटी पढाओ अशी  प्रतिज्ञा घेऊन या मोहिमेच्या फलकावर मान्यवरांनी  स्वाक्षरी केली. त्यानंतर विनोद ढगे व त्यांच्या सहका:यांतर्फे याबाबत पथनाटय़ सादर केले.