शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा रुग्णालयातील अतिक्रमण जमीनदोस्त, काही प्रमाणात झाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 12:27 IST

उर्वरित घरांना तीन दिवसांची मुदत

ठळक मुद्देअधिकृत निवासस्थाने पाडण्यासाठी घेणार परवानगीनिवासस्थानांचे 1939 साली बांधकाम

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 13- जिल्हा रुग्णालयातील निवासस्थाने खाली झाल्यानंतरही तसेच असलेले अतिक्रमण मंगळवारी जमीनदोस्त करण्यात आले. जवळपास 100 घरांचे हे अतिक्रमण काढल्याने हा परिसर मोकळा झाला असून ज्या घरांमध्ये अद्यापही रहिवास होता व साहित्य होते अशा 10 ते 12 घरांना तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.  जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत झाल्यानंतर येथे मोठे बदल व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. यामध्ये आता येथील निवासस्थाने जीर्ण झाल्याने ते पाडून त्या ठिकाणी फ्लॅट सिस्टीमनुसार कमी जागेत जास्त निवासस्थाने उभारण्यात येणार असून उर्वरित जागेत शासकीय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल तसेच महिला व बाल रुग्णालय उभारण्यास प्राधान्य राहणार आहे. येथील निवासस्थानांचे 1939 साली बांधकाम करण्यात आले असून ते जीर्ण झाले आहेत. त्यामुळे ते पाडून नवीन निवासस्थाने बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार गेल्या महिन्यात येथील रहिवाशांना  नोटीस देण्यात आल्या होत्या. त्यानुसार येथील 84 निवासस्थाने रिकामी करण्यात आली.  या ठिकाणी जवळपास 100 अतिक्रमण केलेली घरे होती. ती पाडण्याची प्रक्रिया हाती घेऊन मंगळवारी हे अतिक्रमण जेसीबीद्वारे पाडण्यात आले. यासाठी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास सूचना देऊन जेसीबी उपलब्ध करून दिले. 

उर्वरित अतिक्रमणांना तीन दिवसांची मुदतयेथे 10 ते 12 अतिक्रमीत घरांमध्ये अद्यापही साहित्य असून ते खाली करण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. 

मंगळवारी अतिक्रमण काढत असताना काही जणांनी विरोध केला. मात्र त्यांची समजूत काढण्यात आली व अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील यांनी सांगितले. 

शहराच्या मध्यवर्ती भागात महिला व बाल रुग्णालय असावे म्हणून निवासस्थानांची उभारणी झाल्यानंतर असे रुग्णालय तसेच वेअर हाऊस उभारण्याचाही प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. 

जिल्हा रुग्णालयातील अतिक्रमण मंगळवारी जमीनदोस्त केले असले तरी येथील अधिकृत निवासस्थाने पाडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. निवासस्थाने रिकामी झाली असली तरी ती पाडण्यासाठी सा.बां. विभागाची परवानगी आवश्यक आहे. परवानगी घेऊन ही निवासस्थाने पाडण्यात येतील व त्यानंतरही पुढील कामास सुरुवात होऊ शकले.