शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

दोन महिन्यात जळगाव जिल्हा रुग्णालयाचे रुप पालटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 12:22 AM

डॉ. नागुराव चव्हाण : जिल्हा शल्य चिकित्सक पदी रुजू

ठळक मुद्दे‘आयपीएस’ अंतर्गत पदे भरणारसमन्वयासाठी सर्वाची घेणार बैठकरुग्णसेवा, शिस्तीला प्राधान्य

ऑनलाईन लोकमत / विजयकुमार सैतवाल

जळगाव, दि. 7 -  जिल्हा रुग्णालयात मंजूर पदांपैकी सध्या केवळ 33 टक्केच वैद्यकीय अधिकारी असतील आणि त्याचा  रुग्णसेवेवर परिणाम होत असेल तर रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी आपला प्रयत्न राहील, अशी ग्वाही नूतनजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागुराव चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. इतकेच नव्हे येत्या दोन महिन्यात डॉक्टरांचे पदे 50 ते 75 टक्क्यांर्पयत भरले जातील, असेही त्यांनी सांगितले.  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील भामरे यांची वडाळा, मुंबई येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी डॉ. नागुराव चव्हाण यांनी सोमवार, 7 ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारला. या वेळी त्यांच्याशी ‘लोकमत’ने बातचीत केली असता, त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. जिल्हा रुग्णालयातील मुख्य समस्या असलेल्या वैद्यकीय अधिका:यांच्या रिक्त पदांबाबत डॉ. चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, पदे भरण्यासाठी आरोग्य संचालक, उपसंचालक यांची मंजुरी लागते. येथे 33 टक्केच डॉक्टर असल्याने भारतीय जन आरोग्य मानांकनांतर्गत (आयपीएस) पदे भरण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनीदिली. पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश देऊ‘सर्टिफिकेट फिजीशियन सजर्न’ (सीपीएस) या पदव्युत्तर शिक्षणासाठी येथे विद्याथ्र्यांना प्रवेश देण्यात येऊन रिक्त पदांवर मात करण्याचा प्रयत्न करू, असे  डॉ. चव्हाण यांनी सांगितले. एमबीबीएसनंतर या पदव्युत्तर शिक्षणासाठी येथे प्रवेश दिल्यास विद्याथ्र्याकडून रुग्णसेवा शक्य असल्याचे ते म्हणाले. अशा विविध उपाययोजना करून रिक्त जागांचा पाठपुरावा करण्यात येईल व जास्तीत जास्त डॉक्टर मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. दोन वर्षापासून सर्वत्र सीपीएस पद्धतीने पदे भरली जात आहे. त्याचा येथेही अवलंब करू, असे ते म्हणाले.  प्रत्येकाची होणार नोंदजिल्हा रुग्णालयातील सुरक्षेच्या मुद्दय़ाबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, या ठिकाणी सुरक्षाही महत्त्वाची असून यासाठी रुग्णालयात येणा:या-जाणा:या प्रत्येकाची नोंद ठेवण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी ठेवून संबंधिताचे नाव, संपर्क क्रमांक व इतर माहिती ठेवली जाईल, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले. या सोबतच प्रसूती कक्ष व नवजात बालकांच्या कक्षात माता व बालकाला टॅग लावून काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले. सिटीस्कॅन मशीन लवकरच कार्यान्वितजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन मशीन आलेले आहे, मात्र तिची केवळ जोडणीअपूर्णअसल्याने ते कामही मार्गी लावून मशीन लवकरच रुग्णसेवेत येईल, असे डॉ चव्हाण यांनी सांगितले.जळगाव हा माङयासाठी नवीन जिल्हा असून येथील सर्व माहिती जाणून घेत चांगल्या कामासह रुग्णसेवा, शिस्त यांना आपले प्राधान्य राहील, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले. अन्यथा पत्र..दुपारी पदभार घेतल्यानंतर डॉ. चव्हाण यांनी संध्याकाळी जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. या बाबत त्यांनी सांगितले की, येथील स्वच्छता, सुरक्षितता व नियोजन यावर लक्ष देण्याची गरज आहे. या प्रश्नांवर त्यांनी सध्या संबंधितांना केवळ समजावून सांगितले आहे. यापुढे मात्र पत्र दिले जाईल, असा इशारा दिला. पाहणीनंतर उपाययोजनांसाठी समन्वय आवश्यक असल्याने यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, सुरक्षा रक्षक यांची बैठक घेऊन सूचना देण्यात येणार असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले. येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याच्या हालचाली सुरू असल्याने जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाच्या ताब्यात जाणार असल्याने या बाबत त्यांना विचारले असता, ते म्हणाले वरिष्ट पातळीवरून जशा सूचना मिळतील, त्या पद्धतीने काम करू. वैद्यकीय अधिकारी ते शल्य चिकित्सकबीड येथे 25 वर्षे आरोग्य सेवेचा डॉ. नागुराव चव्हाण यांना अनुभव असून वैद्यकीय अधिकारी ते जिल्हा शल्य चिकित्सक दरम्यानच्या सर्व पदांवर त्यांनी काम पाहिले आहे. तब्बल एक लाख कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याबद्दल त्यांचा शासनातर्फे सत्कार करण्यात आला आहे. मराठवाडय़ात प्लेगची साथ पसरली असताना या साथरोगावर मात करण्यासाठी तसेच किल्लारी येथे भूकंपग्रस्त भागात सतत 10 दिवस आरोग्य सेवा करीत त्यांनी साथरोगावर मात केली आहे. त्यांच्या या अनुभवाचा जळगाव जिल्हावासीयांना लाभ व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.