शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जळगाव जिल्ह्यात तीन मोठ्या प्रकल्पांची पाणीपट्टी थकबाकी १०८ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 12:49 IST

सर्वाधिक बिगर सिंचन थकबाकी ‘हतनूर’ची

जळगाव : जिल्ह्यातील हतनूर, वाघूर व गिरणा या तीन मोठ्या प्रकल्पांची बिगर सिंचन पाणीवापर संस्थांची पाणीपट्टीची थकबाकी तब्बल १०८ कोटींवर पोहोचली आहे. त्यात बहुतांश मनपा, नपा व ग्रा.पं.च्या पाणीपुरवठा योजनाच असल्याने जलसंपदा विभागही हतबल असल्याचे चित्र आहे. हतनूर प्रकल्पाची सर्वाधिक ९३ कोटी ११ लाखांची थकबाकी आहे. त्तर वाघूरची ९ कोटी ८१ लाख व गिरणाची ५ कोटी ६० लाखांची थकबाकी आहे.जिल्ह्यात ३ मोठे प्रकल्प, १३ मध्यम व ९६ लघु प्रकल्प आहेत. त्यापैकी हतनूर, वाघूर व गिरणा या तीन मोठ्या प्रकल्पांवरून मोठ्या प्रमाणात बिगरसिंचनासाठी पाणीवापर संस्थांना पाणीपुरवठा केला जातो. त्यात उद्योगांचाही समावेश आहे.मात्र सिंचन पाणीपट्टीबरोबरच ही बिगर सिंचनाची पाणीपट्टीही मोठ्या प्रमाणात थकीत आहेत. त्यामुळे या तीन प्रकल्पांचे उत्पन्नाचे स्त्रोतच अडचणीत आले आहेत.हतनूरची ९३ कोटी ११ लाख थकबाकीतापी नदीवरील हतनूर धरणावरून तब्बल ५३ पाणीवापर संस्था व ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना बिगर सिंचनासाठी पाणीपुरवठा केला जातो. मात्र त्याच्या पाणीपट्टीची वसुली मात्र नियमित होत नसल्याचे चित्र आहे. बिगरसिंचन पाणीपट्टीची ही थकबाकी आॅक्टोबर २०१९ अखेर ९३ कोटी ११ लाख ६६ हजारांवर पोहोचली आहे. त्यात औद्योगिक थकबाकी सर्वाधिक ९१ कोटी १६ लाख इतकी आहे. त्यात दीपनगर औष्णिक वीज केंद्राची दोन्ही टप्प्यांची मिळून थकबाकी ५६ कोटी ७९ लाख आहे. मध्य रेल्वे भुसावळ १६ कोटी ३१ लाख, विंध्या पेपर मिल दुसखेडा ३कोटी ५० लाख, एमआयडीसी जळगाव १२ कोटी ९ लाख, चोपडा सहकारी साखर कारखाना १ कोटी ३० लाख ७७ हजार यांच्यासह ५३ संस्थांचा समावेश आहे. १२ नगरपालिकांच्या योजनांकडे १ कोटी ३५ लाखांची थकबाकी आहे. तर ग्रामीण पाणीपुरवठा योजनांकडे एकूण ६० लाख ५७ हजारांची थकबाकी आहे.वाघूरची ९ कोटी थकबाकीवाघूर प्रकल्पातर्फे दर दोन महिन्यांनी पाणीपट्टीचे बिल दिले जाते. त्यानुसार बिगरसिंचन पाणीपट्टीची आॅगस्टअखेर ९ कोटी ८१ हजार थकबाकी होती. त्यात जळगाव महापालिका ८ कोटी ६६ लाख ९८ हजार १३० रूपये, नेरी व ७ गाव पाणी योजनेची १९ लाख ४५ हजार २९, जामनेर नगरपरिषद १२ लाख ७० हजार १६७, नशिराबाद ग्रा.पं. १ लाख ६७ हजार ७११ रूपये थकबाकी आहे. केवळ सुप्रीम कंपनीकडून वेळेवर पाणीपट्टी भरली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.गिरणाची ५ कोटी ६० लाख थकबाकीउपलब्ध आकडेवारीनुसार गिरणा प्रकल्पाची सप्टेंबर अखेरपर्यंतची बिगरसिंचनाची थकबाकी ५ कोटी ६० लाख ५५ हजारांची थकबाकी आहे. आॅक्टोबरअखेरची आकडेवारी उपलब्ध झालेली नसल्याचे संबंधीतांनी सांगितले. त्यात मालेगाव मनपाची १ कोटी ४७ लाख ४५ हजार ६५३, एमआयडीसी धुळे १ कोटी १३ लाख १२ हजार६९९, जैन उद्योग समुह जळगाव (नागदुली पाटशाखा) १ कोटी ३६ लाख २६ हजार ६८१, बेलगंगा सहकारी साखर कारखाना (अंबाजी गृप, चाळीसगाव) १ कोटी २८ लाख ५८ हजार ६५२, एरंडोल नगरपालिका ८ लाख ४५ हजार ८९९, भडगाव नगरपालिका ६ लाख ९९ हजार ९४२, पाचोरा नगरपालिका १० लाख ४३ हजार ७६०, चाळीसगाव नगरपालिका ७ लाख ५६ हजार १३१, पारोळा नगरपालिकेची १ लाख ६६ हजार २५१ रूपये थकबाकी आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव