शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात ‘डिपीडीसी’वरील १४ विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 12:23 IST

तीन नामनिर्देशित सदस्यांचाही समावेश

जळगाव : जिल्हा नियोजन समितीवर (डीपीडीसी) पाच महिन्यांपूर्वीच नियुक्त करण्यात आलेल्या १४ ‘विशेष निमंत्रित’ सदस्य तसेच तीन नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्त्या शासनाने रद्द केल्या आहे. तसे आदेश शासनाच्या नियोजन विभागाने २० डिसेंबर रोजी काढले असून या विषयी प्रत्येक जिल्ह्याला कळविण्यात आले आहे. विशेष म्हणजे साडेचार वर्षे रखडलेल्या या नियुक्त्या जुलै २०१९ मध्येच करण्यात आल्या होत्या. आता सरकार बदलताच त्या रद्द करण्यात आल्या आहेत.जिल्हा नियोजन समितीवर ‘विशेष निमंत्रित’ सदस्यांच्या नियुक्त्या साडेचार वर्षे रखडल्या होत्या. गेल्या वेळच्या सरकारचा चार वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ पूर्ण होत आला तरी या नियुक्त्या झालेल्या नव्हत्या. जिल्हा नियोजन समितीवर या नियुक्त्या करायच्या असल्याने त्या विषयी जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य सचिवांनी शासनाला ७ फेब्रवारी २०१९ रोजी पत्र दिले होते. त्यानुसार शासनाने १२ जुलै २०१९ रोजी जिल्ह्यातील १४ जणांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. त्या दरम्यान तीन नामनिर्देशित सदस्यांचीही निवड करण्यात आली होती.सध्या जिल्हा नियोजन समितीवर जिल्हा परिषद गटातून २७, नगरपरिषद गटातून ९ तर महापालिका गटातून ४ असे एकूण ४० सदस्य आहेत. या व्यतिरिक्त १४ विशेष निमंत्रित सदस्य व नियोजन समितीच्या कार्यकारी समितीवर एक खासदार व दोन आमदार असे तीन नामनिर्देशित सदस्यांचीदेखील निवड झाली होते.जिल्हा नियोजन समितीवरील ४० सदस्यांव्यतिरिक्त उर्वरित सर्व सदस्यांच्या नियुक्त्या या आदेशाने रद्द झाल्या आहेत.या विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या झाल्या रद्दधर्मराज रामा वाघ (दहीवद, ता. चाळीसगाव), गजेंद्र अरविंद जायसवाल (चोपडा), रावसाहेब रतनसिंग गिरासे (बोळे, ता. पारोळा), पंकज पंडित चौधरी ( अमळनेर), पद्माकर काशिनाथ महाजन ( रसलपूर, ता. रावेर), मनोहर गिरधर खैरनार ( मुक्ताईनगर), तुषार किसन राणे ( सालबर्डी, ता. मुक्ताईनगर), अ‍ॅड. साहेबराव धर्मा सोनवणे (चोपडा), भागचंद मोतीलाल जैन ( जळगाव), अरुण रुपचंद पाटील (कुºहाड बु. ता. पाचोरा), सुरेश माणिक सोनवणे (जळगाव), हिरालाल व्यंकट चौधरी ( वनोली ता. यावल), समाधान लक्ष्मण पाटील (कुºहे, ता. भुसावळ), जगन्नाथ खंडू चव्हाण (जामनेर).नियुक्त्या रद्द झालेले नामनिर्देशित सदस्यखासदारउन्मेष पाटील,आमदार किशोर पाटील,माजीआमदार हरिभाऊ जावळे.

टॅग्स :Jalgaonजळगाव