शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

जळगाव जिल्हाधिका:यांच्या निवासस्थानी ‘मंगल’चा मांडवपरतणीचा कार्यक्रम

By admin | Updated: May 23, 2017 12:06 IST

रावेरहून प्रथमच माहेरी आलेल्या ‘मंगल’जैन व तिच्या सासरच्या मंडळींचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या शासकीय निवासस्थानी स्वागत करण्यात आले.

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.23- सनईचा मंजूळ स्वर.. स्वागतासाठीची लगबग, पाहुणे मंडळींच्या चेह:यावर आनंदाचे भाव अशा वातावरणात रावेरहून प्रथमच माहेरी आलेल्या ‘मंगल’जैन व तिच्या सासरच्या मंडळींचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या शासकीय निवासस्थानी  स्वागत करण्यात आले. निमित्त होते मांडव परतणीच्या कार्यक्रमाचे. 
स्व. अंबादास पंत वैद्य मतिमंद मूकबधिर बालगृह, वङझर ता. अचलपूर (अमरावती) येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांची मानसकन्या  मंगल व भातखेडा ता. रावेर येथील योगेश जैन यांचा आदर्श विवाह सोहळा शहरात 30 एप्रिल रोजी मोठय़ा उत्साहात झाला. या सोहळ्यात मुलीचे मामा म्हणून जबाबदारी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी स्विकारली होती. याच जबादारीचा एक भाग म्हणून विवाहानंतर काही दिवसांनी मुलीस माहेरी आणण्याचा सोहळा म्हणजे. मांडवपरतणीचा.  पारंपरिक पद्धतीनुसार रविवारी या नवदाम्पत्याला निमंत्रण देण्यासाठी जिल्हाधिकारी निंबाळकर भातखेडा येथे गेले होते. त्यानुसार सोमवारी सायंकाळी हा सोहळा आयोजिण्यात आला होता. 
पापळकर बाबांनी केले स्वागत
जिल्ह्याधिका:यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारावर आपल्या कन्येच्या व व्याह्याच्या स्वागतासाठी शंकरबाबा पापळकर हे सायंकाळपासून उभे होते. या स्वागत सोहळ्याची वेळ जसजशी जवळ येत होती तशी शहरातील मान्यवरांची गर्दी जिल्हाधिका:यांच्या निवासस्थानी होत होती. या सर्वाचे स्वागत पापळकर बाबा स्वत: करत होते. 
सनईचा स्वर अन् रोशणाई..
मंगलच्या स्वागतासाठी विद्युत रोशणाई करण्यात आली होती. तर सनईचे मंद व मधुर स्वर मंगलमय वातावरणात भर घालत होते. सायंकाळी 7.45 वाजेच्या दरम्यान, मंगल व योगेश या नवदाम्पत्याचे माहेरी आगमन झाले. सोबत सासरे देवीदास जैन अन्य नातेवाईक मंडळी कार्यक्रम स्थळी दाखल झाली. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन या  पाहुणे मंडळींचे स्वागत केले. 
औक्षण व ओटी भरण्याचा कार्यक्रम
माहेरी आलेल्या मंगलचे प्रारंभी औक्षण करण्यात आले. त्यानंतर सुवासिनींनी तिची ओटी भरली. यात डॉ. सीमा पाटील, कंचन कांकरिया, हेमा बियाणी, सविता मंत्री, नीलिमा रेदासनी यांचा समावेश होता. यानंतर माहेरचा आहेर म्हणून साडी देखील मंगलला देण्यात आली. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी जावई योगेशला व व्याही देवीदास जैन यांना कपडे देऊन  त्यांचे स्वागत केले.