शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

जळगाव जिल्ह्यातील भाजप शक्तीकेंद्र प्रमुखांचे प्रदेश संघटन मंत्र्यांनी टोचले कान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 22:57 IST

लोकसभा निवडणुकीतील यशाच्या नशेत गाफील राहू नका

जळगाव : लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले. त्यामुळे या यशाची नशा अद्यापही कायम आहे. असे असले तरी आगामी विधानसभा निवडणूक ही राज्याची निवडणूक आहे. यात केंद्रातील नेतृत्त्व कामी येणार नाही. जे करायचे आहे, ते आपल्या सर्वांनाच करायचे आहे, त्यामुळे गाफील राहू नका, अशा शब्दांत भाजपच्या शक्तीकेंद्र प्रमुखांच्या बैठकीत शक्तीकेंद्र प्रमुख व कार्यकर्त्यांचे प्रदेश भाजप संघटन मंत्री विजयराव पुराणिक यांनी कान टोचले. या सोबतच अनेक जण गैरहजर असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा भाजपच्यावतीने बुधवारी जळगाव लोकसभा मतदारसंघातील शक्तीकेंद्र प्रमुखांची संघटनात्मक बैठक शहरातील संत बाबा हरदासराम मंगल कार्यालयात झाली. या बैठकीला जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, प्रदेश भाजप संघटन मंत्री विजयराव पुराणिक, खासदार उन्मेष पाटील, विभाग संघटन मंत्री अ‍ॅड. किशोर काळकर, महाराष्ट्रचे प्रभारी तथा म्हाडाचे चेअरमन संजय केनेकर, जिल्हा महानगराध्यक्ष आमदार सुरेश भोळे, स्मिता वाघ, चंदूलाल पटेल, जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, महापौर सीमा भोळे, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, भाजप जिल्हा ग्रामीण अध्यक्ष डॉ. संजीव पाटील, भाजपचे उपाध्यक्ष पी.सी. पाटील, चिटणीस सुनील बढे, मनपातील भाजप गटनेते भगत बालाणी, सभागृह नेते ललित कोल्हे, प्रा. डॉ. सुनील नेवे, अमळनेरच्या नगराध्यक्षा पुष्पलता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.सुरुवातीला मान्यवरांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज, अतिवृष्टीत मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रास्ताविक डॉ. संजीव पाटील यांनी केले. या बैठकीत जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. पक्ष संघटन मजबुतीसाठी पुराणिक यांनी यावेळी शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ व पन्ना प्रमुख तसेच कार्यकर्त्यांचे चांगलेच कान टोचले.जेवणापर्यंत पोहचतील का?या वेळी पुराणिक यांनी कोणत्या मतदार संघातून किती शक्तीकेंद्र प्रमुख व अपेक्षित कार्यकर्ते किती होते आणि आले किती, याची आकडेवारी विचारत एकप्रकारे हजेरीच घेतली. अनेक जण गैरहजर असल्याने नाराजी व्यक्त करीत जे प्रवासात असल्याचे सांगण्यात आले होते ते जेवणापर्यंत पोहचतील का? असा खोचक प्रश्न विचारला. या सोबतच त्यांनी आपापपल्या परिसरातील बुथवर लोकसभा निवडणुकीत किती मते मिळाली, बैठका किती दिवसातून घेता, २३ कामांची यादी दिली होती तिचे काय झाले यासर्वांचा आढावा घेतला.संघटन हेच भाजपच्या यशाचे गुपीतभाजपच्या यशाचे गुपीत सांगताना पुराणिक यांनी याचे श्रेय पक्षाच्या संघटनला दिले. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता, शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख हे सर्व महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यकर्ता हाच बुथवरील पक्षाचा सीसीटिव्ही आहे, असेही त्यांनी नमूद केले. संघटनच्या बळावर भाजपला यश मिळते. मात्र इतर पक्षांचे तसे नाही, त्यांची सत्ता आली की त्यांचे संघटन खिळखिळे होते, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. या पुढेही कार्यकर्ते जोडा व लाभार्थ्यांना मतदार करा, असा कानममंत्र पुराणिक यांनी दिला. सोबतच लोकसभा निवडणुकीत जे आपले मतदार होते, त्यांच्या घरात आता ‘घड्याळा’चे कॅलेंडर दिसते का, याचा शोध घ्या, असाही सल्ला त्यांनी दिला.बरे झाले बैठकीला मोदी नाहीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यशाचे श्रेय पन्ना प्रमुखांना दिले आहे. मात्र आपल्याकडे पन्ना प्रमुखांची स्थिती पाहिली तर अपेक्षित चित्र नसल्याचे पुराणिक म्हणाले. बरे झाले आजच्या बैठकीला मोदी नाही, असाही उपहासात्मक टोला त्यांनी लगावला.दोन कार्य महत्त्वाचेपक्षाच्यावतीने दोन कार्य करायचे असून १५ आॅगस्ट रोजी अखंड भारताचा स्वातंत्र दिन साजरा होणार असल्याने त्या दिवशी चौकाचौकात ध्वजारोहण करा व मोदींचे स्वागत करा, असे सांगितले. तसेच १६ रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वायजपेयी यांची पुण्यतिथी असल्याने त्या दिवशी त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करा, असेही त्यांनी सांगितले. या सोबतच मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या राख्यांचा आढावाही पुराणिक यांनी घेतला. जेथून कमी पाठविल्या गेल्या असतील तेथे ही संख्या वाढवा. आता हा कार्यक्रम १६ ऐवजी २० रोजी होणार असल्याने आपल्याला संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. सोबतच पूरग्रस्तांसाठी आठ दिवसात निधी संकलन करा, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव