शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: महावीर अर्बन सोसायटीवर जिल्हा बँकेची जप्तीची कारवाई, संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव करणार

By सुनील पाटील | Updated: October 30, 2023 19:38 IST

Jalgaon News: तब्बल ३१ कोटी रुपयांचे कर्ज थकविल्याप्रकरणी जिल्हा बँकेने शहरातील महावीर अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटीवर सोमवारी जप्तीची कारवाई केली.

- सुनील पाटीलजळगाव  - तब्बल ३१ कोटी रुपयांचे कर्ज थकविल्याप्रकरणी जिल्हा बँकेने शहरातील महावीर अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटीवर सोमवारी जप्तीची कारवाई केली. यासंदर्भात नोटीसा डकविण्यात आलेल्या असून संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी दिली.

जिल्हा बँकेने सन २००२ मध्ये महावीर अर्बन को ऑप क्रेडीट सोसा.लि. जळगांव यांना ८ कोटीचे कर्जवाटप केलेले होते. कर्जाच्या वसुलीसाठी जिल्हा बँकेने वारंवार तगादा लावला. त्याशिवाय संचालक मंडळाने दीड वर्षाची एक कमी परतफेड योजना (ओटीएस) सुविधा देवून सुध्दा संस्थेने  कर्जाची परतफेड केलेली नाही. २०१९ मध्ये सहकार न्यायालयाच्या आदेशाने महाराष्ट्र सहकारी कायदा १९६० चे कलम ९८ (ब) अन्वये वसुलीप्रमाणपत्र मिळवून वसुलीसाठी बँकेने प्रयत्न करीत आहे. त्यानुसार सोमवारी बँकेचे विशेष वसुली अधिकारी मयुर पाटील, सरव्यवस्थापक प्रल्हाद सपकाळे व मंगलसिंग सोनवणे आदींच्या पथकाने संचालकांच्या घरी धडक दिली.

यांच्या मालमत्ता होणार विक्रीबँकेच्या पथकाने सोसायटीचे संचालक सुरेंद्र लुंकड, सुभाष सांखला, तुळशिराम बारी, सुरेश टाटीया, अपना राका, सुरेश बन्सीलाल जैन, महेंद्र शहा, अजित कुचेरीया यांच्या घरी व सोसायटीच्या नवीपेठ येथील कार्यालयात जप्तीची कारवाई करुन नोटीसा डकविल्या. मुद्दल व व्याज मिळून सोसायटीकडे जिल्हा बँकेचे ३१ कोटी २८ लाख रुपये घेणे आहे. संचालक मंडळाला जबाबदार धरुन ही कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Jalgaonजळगाव