शहरं
Join us  
Trending Stories
1
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
2
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
3
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
4
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
5
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
6
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
7
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
8
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
9
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
10
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
11
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
12
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
13
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
14
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
15
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
16
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
17
IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची तुफान फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या
18
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
19
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
20
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना

सीबीआयकडून जळगाव जिल्हा बँकेची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 15:35 IST

केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय)चे सहा अधिका-यांचे पथक गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात दाखल झाले असून या पथकाकडून जिल्हा बँकेची मुख्य शाखा तसेच चोपडा व अमळनेर शाखांचीही तपासणी करण्यात आली.

 ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. 2 - केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय)चे सहा अधिका-यांचे पथक गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात दाखल झाले असून या पथकाकडून जिल्हा बँकेची मुख्य शाखा तसेच चोपडा व अमळनेर शाखांचीही तपासणी करण्यात आली. नोटाबंदीच्या काळात जिल्हा बँकेत १५० कोटीच्या ठेवी व ३० कोटींचा कर्ज भरणा झाला होता. अवघ्या तीन दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात ही रक्कम बँकेत जमा झाल्याने त्याची चौकशी सीबीआयने सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
सीबीआयच्या या पथकात ५ पुरुष व १ महिला अधिका-याचा समावेश आहे. गुरुवारी सकाळी ९.३० वाजताच हे पथक जिल्हा बॅँकेच्या मुख्य शाखेत दाखल झाले. कार्यालयात शिपाई व सुरक्षा रक्षकाशिवाय कोणीच नव्हते. कर्मचा-यांनी ही माहिती बॅँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांना दिली. ते लागलीच बँकेत दाखल झाले. बाहेरील पथक आल्याच्या पार्श्वभूमीवर बँकेत स्मशान शांतता होती.
 
अभिकोष व सांख्यिकी विभागात तपासणी
जिल्हा बँकेत चार जणांचे पथक होते. त्या शिवाय बीएसएनएल व रेल्वे विभाग असे प्रत्येकी दोन या प्रमाणे 4 पंच साक्षीदार सोबत घेण्यात आले होते. या पथकाने सुरुवातीला अभिकोष व सांख्यिकी विभागात कागदपत्रांची तपासणी केली. 
 
पत्रकार व नागरिकांना प्रवेश बंदी
दुपारी बारा वाजेनंतर बाहेरील व्यक्ती तसेच पत्रकारांना बँकेत प्रवेश नाकारण्यात आला होता. प्रवेशद्वाराजवळच सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला होता. बँक कर्मचारी व महत्त्वाचे काम असलेल्या लोकांनाच प्रवेश दिला जात होता. तशी नोंद सुरक्षा रक्षकाकडे घेतली जात होती. नेमके कोण अधिकारी आहेत हे दुपारपर्यंत निम्म्याहून अधिक कर्मचा-यांना माहितीही नव्हते.