शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसाचा मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 12:51 IST

पावसाने आताच गाठली गतवर्षीची सरासरी

जळगाव : जळगाव जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा मुक्काम दुसºया दिवशीही कायम आहे. सोमवारी रात्रभर पाऊस सुरूच होता. जळगाव शहरातसह मंगळवारी दुपारपर्यंत सूर्यदर्शन झालेले नव्हते.चाळीसगाव तालुक्यात सोमवारी दुपारी पाऊस सुरू झाला होता. जामनेरातही पाऊस सुरू असून रस्ते, शेतातून पाणी वाहून निघाले. चोपडा तालुक्यातही रविवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली.मागील वर्षी आॅक्टोबर अखेर जिल्ह्यात सरासरी ७२.२ टक्के पाऊस झाला होता. ही सरासरी यंदा आॅगस्टचा एक आठवडाच बाकी असताना गाठली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ७२ टक्के पाऊस झाला आहे. मात्र चाळीसगाव तालुक्यात अद्यापही जोरदार पावसाची गरज आहे. सोमवारी पावसाने चाळीसगाव तालुक्यासह जिल्हाभरात हजेरी लावली. दरम्यान चाळीसगाव तालुक्यात अद्यापही ६ गावांना ४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.शासकीय पावसाळा हा जून ते सप्टेंबर या कालावधीत असतो. त्यानुसार गतवर्षी ३० सप्टेंबर अखेर सुमारे ६८ टक्के पाऊस झाला होता. मात्र त्यात मोठ्या प्रमाणावर खंड पडला होता. त्यानंतर आॅक्टोबरअखेरपर्यंत पडलेल्या पावसामुळे सरासरी ७२.२ टक्के झाली होती. मात्र यंदा आॅगस्टचा एक आठवडा बाकी असतानाच गत वर्षीची सप्टेंबरची सरासरी ओलांडली असून आॅक्टोबर अखेरच्या सरासरीचीही बरोबरी केली आहे.मुक्ताईनगरची आघाडीमुक्ताईनगर तालुक्यात सर्वाधिक ८६ टक्के पाऊस झाला आहे. तर १५ पैकी ९ तालुक्यांमध्ये पावसाने सरासरीची सत्तरी पार केली आहे. त्यात मुक्ताईनगरसह यावल ८५.१ टक्के, जामनेर ७८.७ टक्के, एरंडोल ७३.९ टक्के, भुसावळ ७७.९ टक्के, रावेर ७८.६ टक्के, बोदवड ७९ टक्के, पारोळा ७०.५, चोपडा तालुक्यात ७१.५ टक्के पाऊस झाला आहे.चाळीसगाव तालुक्यात ५३.१ टक्के पाऊसचाळीसगाव तालुक्यात मात्र जिल्ह्यात सर्वात कमी ५३.१ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्हाभरातील टँकर बंद झाले असले तरीही चाळीसगाव तालुक्यात मात्र अद्यापही ६ गावांना ४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दरम्यान जळगाव तालुक्यात ६७.६ टक्के, धरणगाव ६९.५ टक्के, पाचोरा ६८ टक्के, भडगाव ६३ टक्के, अमळनेर तालुक्यात ६५.९ टक्के पाऊस झाला आहे.शहरात १० दिवसांनंतर पाऊसजळगाव शहरात २३ जुलै पासून पावसाचे आगमन झाले. तेव्हापासून पावसाने दोन-चार दिवसांचा अपवाद वगळता सातत्याने हजेरी लावली आहे. संततधार पावसानंतर दहा दिवसांचा खंड पावसाने दिला. त्यानंतर सोमवारपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी पहाटेच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. आधीच खराब झालेल्या रस्त्यांवर चिखल व पाण्याचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले.

टॅग्स :Jalgaonजळगाव