शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

 अंगावर रिक्षा उलटल्याने जळगाव जिल्ह्यात दहावीचा विद्यार्थी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 16:52 IST

रिक्षाने शाळेत जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे रिक्षा अंगावर पलटी होऊन चेतन दिवाकर सोनवणे (वय १५ रा. देऊळवाडा, ता. जळगाव ह.मु.जोगलखेडा, ता.भुसावळ) हा विद्यार्थी जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता जोगलखेडा-साकेगाव रस्त्यावर घडली. 

ठळक मुद्दे  साकेगावजवळ अपघात   शाळेत जात असतानाच घडली दुर्घटना रिक्षा चालक जखमी

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, १० :  रिक्षाने शाळेत जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे रिक्षा अंगावर पलटी होऊन चेतन दिवाकर सोनवणे (वय १५ रा. देऊळवाडा, ता. जळगाव ह.मु.जोगलखेडा, ता.भुसावळ) हा विद्यार्थी जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता जोगलखेडा-साकेगाव रस्त्यावर घडली. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, चेतन हा भुसावळ येथील सानेगुरुजी विद्यालयात शिक्षण घेत आहे. जोगलखेडा येथून सावन धनराज ढिवरे याच्या रिक्षाने (क्र.एम.एच.१९-९२४८) तो भुसावळ येथे शाळेत जायला निघाला. या रिक्षात चालक व चेतन असे दोघंच होते तर साकेगाव येथून काही विद्यार्थी या रिक्षात बसणार होते. जोगलखेडा सोडल्यानंतर काही अंतरावर चालकाचे नियंत्रण सुटले, त्यामुळे रिक्षा पलटी झाली. मागे बसलेला चेतन हा बाहेर फेकला गेला व त्यात ही रिक्षा पुन्हा उलटली ती चेतनच्या डोक्यावरच. या अपघातात जागेवरच चेतनच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला, त्यामुळे तो जागीच गतप्राण झाला. रिक्षा चालक जखमी झाला असून त्याला भुसावळ येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.