जळगाव : मनपाकडून गुरुवारी सकाळी ९ वाजेपासून प्रमुख पाच रस्त्यांवर विशेष अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येत असून यामध्ये अतिक्रमण काढत असताना कोर्ट चौकात वाद झाला. सकाळी काही दुकानदारांना अटकही करण्यात आले. अतिक्रमण काढताना अनेक दुकानदारांना अश्रू अनावर झाले.अतिक्रमण हटविण्यासंदर्भात बुधवारी आयुक्त चंद्रकांत डांगे मनपातील सर्व विभागाप्रमुखांची बैठक घेत, अतिक्रमण कारवाईसाठी विशेष सूचना दिल्या. या कारवाईसाठी मनपाकडून एकूण ५ पथके तयार करण्यात आली असून, प्रत्येक पथकात ३० अशा एकूण १५० कर्मचाºयांचा ताफा सोबत आहे.मनपाच्या दुसºया मजल्यावरील सभागृहात सर्व विभागप्रमुखांची आयुक्तांनी बैठक घेतली. यावेळी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील कर्मचाºयांसह गुरुवारी सकाळी ९ वाजेपासून मनपाच्या आवारात उपस्थित राहण्याचा सूचना देण्यात आल्या. तसेच जे विभागप्रमुख किंवा कर्मचारी उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देखील आयुक्तांनी दिला आहे. या बैठकीला तहसीलदार अमोल निकम, पोलीस निरीक्षक देविदास कुनगर उपस्थित होते.
अतिक्रमण काढताना जळगावात वाद, दुकानदारांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 12:09 IST
मनपाची आजपासून विशेष अतिक्रमण निर्मूलन मोहीम
अतिक्रमण काढताना जळगावात वाद, दुकानदारांना अटक
ठळक मुद्दे १५० कर्मचाऱ्यांचा ताफा पक्की अतिक्रमणेही काढली जाणार