पारोळा, जि. जळगाव : भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात जळगाव येथील मधुकर महारु पाटील व त्यांच्या पत्नी जागीच ठार झाल्या. हा अपघात रविवारी सकाळी पारोळ््यानजीक घडला.मिळालेल्या माहितीनुसार, मधुकर पाटील हे धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे त्यांच्या मावशीला भेटण्यासाठी दुचाकीवर जात होते. वाटेतच त्यांचा अपघात झाला.
पारोळ््यानजीक अपघातात जळगावचे दांपत्य ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 13:26 IST