शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरातील मेहरुणमध्ये सट्टा सुरुच, वाघ नगरात फलक कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 16:04 IST

शहरात सुरु असलेल्या सट्टा व्यवसायाबाबत ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रकाशित होताच गुरुवारी ९० टक्के सटोड्यांनी स्वत:हून दुकान बंद ठेवले. मेहरुणमध्ये महादेव मंदिराला लागून एका नाश्त्याच्या हॉटेलच्या आडोशाला सुरु असलेला सट्टा सुरुच होता तर वाघ नगरातील दुकान बंद झाले होते, मात्र तेथे आकड्यांचा फलक कायम होता. त्यावर सट्ट्याचे आकडे लिहिण्यात आले होते.

ठळक मुद्दे पोलिसांकडून कारवाई झालीच नाही   काहींनी स्वत:हून ठेवले दुकान बंदअवैध वाहतुकही बोकाळली

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१८ :  शहरात सुरु असलेल्या सट्टा व्यवसायाबाबत ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रकाशित होताच गुरुवारी ९० टक्के सटोड्यांनी स्वत:हून दुकान बंद ठेवले. मेहरुणमध्ये महादेव मंदिराला लागून एका नाश्त्याच्या हॉटेलच्या आडोशाला सुरु असलेला सट्टा सुरुच होता तर वाघ नगरातील दुकान बंद झाले होते, मात्र तेथे आकड्यांचा फलक कायम होता. त्यावर सट्ट्याचे आकडे लिहिण्यात आले होते.शहरातील अवैध धंद्यांबाबत गुरुवारी ‘लोकमत’ ने निर्भिडपणे वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताचे शहरातील नागरिकांनी स्वागत करुन ‘लोकमत’चे आभार मानले. गल्लोगल्ली रहिवाशी वस्ती तसेच प्रमुख रस्त्यावर सटोड्यांनी आपले दुकान मांडले होते. या सट्टा व्यवसायातून महिन्याला एकट्या जळगाव शहरात कोट्यवधीची उलाढाल होत आहे. जुगार, अवैध प्रवाशी वाहतूक, अवैध दारु, वाळू, गुटखा, सोरट यासारखे अवैध धंदेही शहरात सर्रास सुरु आहेत. पोलीस बॉईज अवैध धंद्यातशहरात काही ठिकाणच्या सट्टा व्यवसायात राजकारण्यांप्रमाणे पोलीस बॉईजही सक्रीय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन ठिकाणचे सट्टे हे पोलीस बॉईजचेच आहेत. अग्रवाल चौकात एका हॉटेलच्या पाठीमागे तसेच इच्छा देवी पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सट्टा अड्याविषयी अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महामार्गावर भररस्त्यावर सट्टा व्यवसाय चालतो यावरुन धंदेवाल्यांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे सिध्द होते.एस.पींच्या तंबीनंतरही धंदे सुरुशहरात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत, तसा प्रकार आढळला किंवा कोणाची तक्रार आली तर प्रभारी अधिकाºयांवर कारवाई करण्याची तंबी वजा इशारा पोलीस अधीक्षकांनी गेल्या महिन्यात झालेल्या आढावा बैठकीत दिला होता. त्यानंतरही एस.पींना अंधारात ठेऊन प्रभारी अधिकाºयांनी आपल्या हद्दीत बिनधास्तपणे धंदे सुरुच ठेवले होते.अवैध वाहतुकीतून लाखोचा मलिदाचित्रविचित्र क्रमांक, दुचाकीवर तीन सीट, वाहन परवाना नसणे अशा कारणांनी सामान्य वाहनधारकांना वेठीस धरणारी वाहतूक शाखा त्यांच्या डोळ्यासमोर शहरातून अवैध प्रवाशी वाहतूक करणाºया खासगी वाहनांवर कारवाई करीत नाही. त्यांच्याकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष केले जाते. ट्रॅव्हल्स, कालीपीली, ट्रक यांच्याकडून दरमहा लाखोचा मलिदा गोळा केला जातो. वाहतूक शाखेसह ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध प्रवाशी वाहतूक करणाºया वाहनांचे थांबे आहेत, तेथील वाहनधारकांकडून पोलीस ठाण्याच्या कर्मंचाºयाकडून वसूली केली जाते.