शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरात बक-या चोरीच्या संशयावरुन मायलेकांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 11:41 IST

बक-या चोरीच्या संशयावरुन शनी पेठेत शनिवारी दुपारी एक ३५ वर्षीय महिला व तिच्या दोन लहान मुलांना रहिवाशी महिलांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या तिघं मायलेकांना मारहाण करीतच शनी पेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ठळक मुद्देशनी पेठेत वाद पोळीचे तुकडे खाऊ घालून चोरली बकरीसंशयित महिलेल्या लहान मुलाला हिसकावले पोलिसांच्या तावडीतून

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१५ :बक-या चोरीच्या संशयावरुन शनी पेठेत शनिवारी दुपारी एक ३५ वर्षीय महिला व तिच्या दोन लहान मुलांना रहिवाशी महिलांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या तिघं मायलेकांना मारहाण करीतच शनी पेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी ही महिला, तिचे मुले व चोरलेली बकरी ताब्यात घेतली आहे.  याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जब्बार खान अलीर खान (वय ६० रा.शनी पेठ, जळगाव) यांच्याकडे तीन बक-या व एक बोकड आहे. दररोज सकाळी आठ वाजता बकºया व बोकड चरण्यासाठी सोडतात व दुपारी दोन वाजता त्यांना घरी आणले जाते. शनिवारी एक बोकड व एक बकरी घरी न आल्याने जब्बार खान यांनी शनी पेठ, काट्याफाईल व परिसरात त्यांचा शोध घेतला मात्र मिळून आल्या नाहीत. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द शनी पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोळीचे तुकडे टाकून लांबविली बकरी  सूत्रांच्या मते पकडण्यात आलेली महिला पोळीचे तुकडे टाकून बकºयांना जवळ बोलावून घेऊन जाते. शनिवारी असाच प्रकार झाला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शनी पेठेतील महिलांनी या महिलेला बेदम मारहाण केली. त्यानंतर काही जणांनी तिच्या दोन्ही लहान मुलांनाही मारहाण केली. मारतच या तिघांना पोलीस स्टेशनला नेण्यात आले. ही महिला तिचे खरे नाव सांगत नाही. कधी सुप्रीम कॉलनी, मलकापूर तर कधी सुरत येथील रहिवाशी असल्याचे सांगत आहे.

  पोलिसांच्या तावडीतून नेले मुलाला

 शनी पेठ व चौबे शाळेच्या मागील भागातून अनेक बकºया चोरी गेल्या आहेत. या बकºया या महिलेनेच लांबविल्याचा संशय असून ती सुप्रीम कॉलनीत राहत असल्याचा संशयावरुन काही जणांनी तिच्या एका दहा वर्षाच्या मुलाला पोलिसांच्या तावडीतून स्वत:च्या ताब्यात घेतले. त्यानंतर एका रिक्षातून त्याला सुप्रीम कॉलनीत घेऊन गेले. सायंकाळी उशिरापर्यंत हा मुलगा परत आलेला नव्हता. आधीच या मुलांना बेदम मारहाण झाली. या संतापात आणखी काही प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण? पोलिसांनी या मुलाला लोकांच्या ताब्यात दिलेच कसे असे प्रश्न तेथे उपस्थित लोकांनी केले.