शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

जळगाव शहर मतदार संघ : १३ उमेदवारांचा २५ लाख ७७ हजार ६२९ रुपये खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 13:00 IST

अंतिम तपासणी ११ नोव्हेंबर रोजी

जळगाव : विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या खर्चाची तिसरी हिशोब तपासणी १८ रोजी करण्यात आले. यामध्ये निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण १३ उमेदवारांचा २५ लाख ७७ हजार ६२९ रुपये खर्र्च झाला आहे. आता उमेदवारांच्या खर्चाची अंतिम तपासणी मतदानानंतर ११ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार असून त्या विषयी उमेदवारांना पत्र देण्यात आले आहे.जळगाव शहर मतदार संघात निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या हिशोब वहीची तिसरी तपासणी १८ रोजी करण्यात आली.यात उमेदवारांनी सादर केलेल्या हिशोबानुसार भाजपचे उमेदवार सुरेश भोळे यांचा १३ लाख ८० हजार ४६० रुपये खर्च झाला आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभिषेक पाटील यांचा ६ लाख ८९ हजार ७३० रुपये, वंचित बहुजन आघाडीचे शफी अ.नबी शेख एक लाख २२ हजार ३२ रुपये, अपक्ष उमेदवार शिवराम पाटील यांचा ७८ हजार ९४७ रुपये, अपक्ष उमेदवार अनिल वाघ यांचा ६९ हजार ७४३ रुपये, मनसेचे जमील देशपांडे यांचा ४७ हजार ७७७ रुपये, अपक्ष डॉ. आशीष जाधव यांचा ४६ हजार २१६ रुपये, महाराष्ट्र क्रांती सेनेच्या वंदना पाटील यांचा ३६ हजार ७०५ रुपये, अपक्ष माया अहिरे यांचा २९ हजार ७२६ रुपये, बहुजन समाज पक्षाचे अशोक शिंपी यांचा २८ हजार ९०७ रुपये, अपक्ष गोकूळ चव्हाण यांचा २४ हजार ९५० रुपये, अपक्ष ललित शर्मा यांचा १३ हजार ३६६ रुपये, बहुजन मुक्ती पक्षाचे गौरव सुरवाडे ९ हजार ७० रुपये असा एकूण १३ उमेदवारांचा २५ लाख ७७ हजार ६२९ रुपये खर्च झाल्याची माहिती निवडणूक खर्च हिशोब शाखेतून मिळाली.अंतिम तपासणी ११ नोव्हेंबर रोजीविधानसभा निवडणूक लढविणाºया उमेदवारांच्या खर्चाची अंतिम तपासणी मतदानानंतर ११ नोव्हेंबर रोजी १० वाजता करण्यात येणार आहे. या साठी निवडणूक खर्चाची हिशोब नोंदवही सादर करण्यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांना पत्र दिले आहे.यामध्ये उमेदवारांना त्यांचे अद्यायावत केलेले बँक पासबुक, हिशोबाकरीता दर्शविण्यात आलेले देयके, मूळ कागदपत्र, खर्च वाहन परवाना या सोबतच दैनंदिन खर्च पडताळणी वरील ठरवून दिलेल्या दिवशी सादर करावे लागणार आहे.उमेदवारांनी माहिती सादर केल्यानंतर त्यांची लेखा पडताळणी होऊन आवश्यक लेखांकन विवरण पत्र निवडणूक निरीक्षकांच्या स्वाक्षरीनंतर निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याच्याही सूचना पत्रात दिल्या आहेत. उमेदवारांनी अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी ठरवून दिलेल्या दिवशी आपल्या हिशोब नोंदवहीसह हजर रहावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी दीपमाला चौरे यांनी केले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव