शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी युतीच्या उमेदवाराचा शोध सुरू - गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 01:12 IST

भजी महोत्सवात युती कायम राहणार असल्याची घोषणा

जळगाव : भाजप-शिवसेनेची युती अभेद्यच असून यापुढेही ती कायम राहणार आहे. जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी आता युतीच्या उमेदवाराचा शोध सुरू असल्याची घोषणा जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी संध्याकाळी मेहरुण चौपाटीवर केली. त्यामुळे उमेदवार आता भाजपचा राहणार की शिवसेनेचा अशी चर्चा होऊ लागली आहे.मराठी प्रतिष्ठान व सुबोनिया सो टेस्टी यांच्या संयुक्तविद्यमाने शनिवारी संध्याकाळी मेहरुण तलावाच्या काठी भजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.महोत्सवला महाजन यांच्यासह माजी मंत्री सुरेशदादा जैन, माजी खासदार ईश्वरलाल जैन, आमदार सुरेश भोळे, माजी महापौर ललित कोल्हे, विष्णू भंगाळे, नगरसेवक कैलास सोनवणे, मनपाचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, भारती सोनवणे, अतुल हाडा, अमर जैन, जितेंद्र मुंदडा, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. जमील देशपांडे, उपाध्यक्ष विजय वाणी यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.अभेद्य युतीचा केक कापलाया भजी महोत्सवाचे वैशिष्ट म्हणजे या महोत्सवात सत्ताधाऱ्यांसह मनपातील सत्ताधारी व विरोधक तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमेकांना भजी भरविली. तत्पूर्वी या महोत्सवाच्या प्रारंभी ‘अभेद्य युती’ असा उल्लेख असलेला केक गिरीश महाजन, सुरेशदादा जैन, ईश्वरलाल जैन यांच्याहस्ते कापण्यात आला. यानंतर तो तिघांनी एकमेकांना भरविला. विधानसभा निवडणुकीपर्यंत हा गोडवा आणि भाजप व सेनेची युती कायम राहणार असल्याचीही घोषणा केली.युतीची भजीपत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले की, याठिकाणी भगव्या व हिरव्या अशा दोन्ही रंगाची भजी असून ही भाजप व सेनेच्या युतीची भजे असल्याचा उल्लेख केला. आम्ही सर्व एकत्रित असून आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत, असे सांगून जळगावच्या विकासाठी आम्ही एकत्र असल्याचे जाहीर केले. युती राहणार त्यासाठी उमेदवाराचा शोध सुरू असल्याचेही त्यांनी जाहीर केले.उमेदवार कोणाचा?जळगाव शहर मतदार संघासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे सुरेशदादा जैन हे निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर झाले होते. त्यानंतर भाजपचे आमदार सुरेश भोळे हे राहणार असल्याचीही चर्चा सुरू झाली. मात्र शनिवारी गिरीश महाजन यांनी युतीच्या उमेदवाराचा शोध सुरू असल्याचे सांगितल्याने उमेदवार भाजपचा राहणार की शिवसेनेचा अशी चर्चा होऊ लागली आहे.जो उमेदवार असेल त्याचा प्रचार करणारसुरेशदादा जैन म्हणाले की, आम्ही आज या महोत्सवात अभेद्य युतीचा केक कापला आहे. या अभेद्य युतीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राच्या समोर असून महाराष्ट्राप्रमाणेच आम्ही जळगावच्याही विकासासाठी सर्व मिळून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी कोणालाही मिळो, त्यांचा प्रचार केला जाईल, असेही सुरेशदादांनी स्पष्ट केले. एकमेकांना केक भरविला असून त्याचा गोडवा भावी आमदारांमध्येही कायम राहणार असल्याचे सुरेशदादा म्हणाले. विनाकारण कोणी भांडणे लावू नये, असेही आवाहन त्यांनी केले.गिरीश महाजन यांना नेहमीच आशीर्वाद - ईश्वरलाल जैनजामनेरचा विकास व्हावा हा माझा प्रामाणिक उद्देश आहे आणि तो विकास गिरीश महाजन करीत असतील तर त्यांना माझा नेहमीच आशीर्वाद असल्याचे ईश्वरलाल जैन यांनी सांगितले.लहानपणापासूनच बाबुजींच्या हातचे भजी खातोय - गिरीश महाजनईश्वरलाल जैन व गिरीश महाजन यांनी एकमेकांना भजी भरवावी, असा आग्रह झाल्यानंतर मी लहानपणापासूनच बाबुजींच्या हातचे भजी खात असल्याचे गिरीश महाजन म्हणाले. त्यामुळे हंशा पिकला.मिरची आमदारांनाया महोत्सवात ईश्वरलाल जैन व आमदार सुरेश भोळे यांनी एकमेकांना तर सुरेशदादा जैन व गिरीश महाजन यांनी एकमेकांना भजी भरविली. त्या वेळी मिरची आली असता सुरेशदादा व महाजन यांनी दोघांनीही ती न खाता आमदार सुरेश भोळे यांना खाऊ घातली.१५ प्रकारचे गरमागरम भजेमेहरुण तलावाच्या निसर्गरम्य वातावरणात कोसळणाºया पावसाच्या सरीमध्ये शहरवासीयांनी विविध १५ प्रकारचे गरमागरम भजे, गुळाची गरम जिलेबी, वाफाळणारा चहा यांचा आस्वाद घेतला. भजी महोत्सवात बटाटे, पालक, मिरची, गिलके अशा वेगवेगळ्या १५ प्रकारची भजे होती.मंत्र्यांनीही काढली सेल्फीया महोत्सवात भजे खाण्यासाठी खवय्यांनी मोठी गर्दी केली होती. सोबतच सेल्फी पॉईंटवरही गर्दी केली होती. मंत्री महाजन यांच्यासह पदाधिकाऱ्यांनीही याठिकाणी सेल्फी काढला.

टॅग्स :Jalgaonजळगाव