शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव बसस्थानकावर ४५० किलो खवा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 13:08 IST

उघड्यावर अस्वच्छ ठिकाणी आढळला खवा

जळगाव : जळगाव बसस्थानक परिसरात उघड्यावर अस्वच्छ ठिकाणी पाच तास पडून असलेला तब्बल ४५० किलो खवा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या पहिल्याच कारवाईत ७० हजार रुपयांचा खवा आढळून आला. खव्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त खव्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. त्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने मोहीम हाती घेण्यात आली असून गुरुवारी भेसळयुक्त खवा शहरात आल्याच्या संशयावरून बसस्थानकावर तपासणी करण्यात आली. त्या वेळी बसस्थानक परिसरात अस्वच्छ ठिकाणी उघड्यावर खवा ठेवल्याचे आढळून आले. दुग्धजन्य व नाशवंत पदार्थ असलेला खवा ठराविक तापमानात ठेवणे गरजेचे असताना पहाटे पाच वाजेपासून पाच तास हा खवा उघड्यावर पडलेला होता. याची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त वाय.के. बेंडकुळे यांच्यासह अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील, नमुना सहायक चंद्रकांत सोनवणे, समाधान बारी, प्रवीण धोंडकर यांनी तपासणी केली. यात ४५० किलो खवा अस्वच्छ ठिकाणी आढळून आला.शहरातील तीन विक्रेत्यांचा हा खवा असून तो बाहेरगावाहून एस.टी. बसने आल्याची माहिती मिळाली. हा खवा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अहवाल आल्यानंतर तीनही विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, सणासुदीच्या काळात भेसळयुक्त खव्याची आवक वाढण्याची शक्यता असून त्या पार्श्वभूमीवर तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असल्याचे विवेक पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव