शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

आठवडाभरासाठी जळगाव, भुसावळ, अमळनेर पुन्हा ‘लॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 12:40 IST

अनियंत्रित गर्दीमुळे कोरोनावरचेही नियंत्रण सुटले

जळगाव : कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या जळगाव, भुसावळ, अमळनेर या तीन शहरात सात दिवस कडकडीत बंद जाहीर करण्यात आला आहे़ अनलॉकच्या काळात जळगाव शहरातील अनियंत्रित गर्दी व त्यामुळे झपाट्याने पसरणारा कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय पुढे करण्यात आला आहे. दरम्यान, आधीच १०० दिवसांचा लॉकडाऊन झाला आहे मग आता सात दिवसांचा लॉकडाऊन कशासाठी असा प्रश्न करीत निर्णयाला सोशल मिडीयातून जोरदार विरोध सुरु झाला आहे.आता लॉकडाऊनआधी रविवार आणि सोमवारी होणारी गर्दी रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर राहणार आहे.४१ टक्के रुग्ण तीन शहरातजळगाव शहर हे जिल्हाभरातील सर्वात मोठे हॉटस्पॉट म्हणून समोर आले आहे़ या पाठोपाठ भुसावळ व अमळनेरातही रुग्णवाढीचा वेग अत्यंत धोकादायक आहे़ या तीनही शहरांमधील रुग्णसंख्या ही एकत्रित जिल्ह्याच्या ४१ टक्के आहे़ त्यामुळे या भागात लॉकडाऊनची अत्यंत आवश्यकता असल्याचा सूर मध्यंतरीच्या काळात उमटत होेता़ सोशल मीडियासह अनेक सामाजिक कार्यकर्ते, अनेक डॉक्टर्स यांच्याकडूनही तशा मागण्या जोर धरीत होती.प्रतिबंधात्मक उपायच महत्त्वाचेजुलै महिना हा कोरोनाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असणार आहे़ असे वरिष्ठ पातळीवरून सांगण्यात येत आहे. डॉक्टर्सनीही ते मान्य केले होते़ अशा स्थितीत केवळ बेडची संख्या वाढवून जळगावात भागणार नाही़ त्यासाठी हा संसर्ग रोखणेच अत्यंत गरजेचे व अत्यावश्यक ठरणार आहे़ त्यामुळे परिस्थिती नियंत्राबाहेर जाऊ नये म्हणून अखेर लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे़ सद्या स्थितीत बेडची संख्या वाढविली तरी रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेशे मनुष्यबळ आहे का असाही एक प्रश्न उपस्थित करण्यात आला होता़ त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाकडे बघितले जात आहेत़ शहरात दरारोज सर्वाधिक रुग्ण आढळून येत होते़ सरासरी रुग्ण आढळण्याचे प्रमाण हे जळगाव शहरात प्रचंड होते़ शुक्रवारी एकाच दिवसात ५५ नवे रुग्ण आढळून आले होते़ अशा स्थितीत शहरात लॉकडाऊनची मागणी जोर धरत होती़‘कण्टेनमेंट झोन’मधील वातावरण सुरक्षित असतं तर?जळगावमध्ये कन्टेनमेंट झोनमधील वातावरण असुरक्षित होतं. या झोनमध्ये बाहेरून आत जाता येत होतं आणि या झोनमधील नागरिकही बाहेर मुक्तपणे वावरत होते. याबाबत ‘लोकमत’ने स्टींग आॅपरेशनही केले होते. जर याबाबत प्रशासनाने जागरूकता दाखवली असती तर कोरोनाचा वाढत्या आकड्याला बºयाचप्रमाणात आळा घालता आला असता. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला हेदेखील एक कारण असल्याचे म्हटले जात आहे.रेडझोनमधून बाहेर पडण्यासाठी उपाययोजना- राऊतलॉकडाऊनचे आदेश सर्वांनी अत्यंत बारकाईन वाचावे, यात सर्व माहिती इत्यंभूत व सोप्यापद्धतीने दिली आहे़ लॉकडाऊनचे तंतोतंत पालन केल्यास आपण रेड झोनच्या निकषातून बाहेर पडू, याचा जिल्ह्याच्या आरोग्यावर व पर्यावरणावर चांगला परिणाम होईल, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी म्हटले असून लॉकडाऊनचे पालन करण्याचे आवाहन केले आहे़पोलीस बंदोबस्तात वाढ : पोलीस अधीक्षकजळगाव, भुसावळ व अमळनेर या तीन शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. भुसावळ शहरात आधीच एसआरपी कंपनी तैनात करण्यात आली आहे. त्याशिवाय इतर ठिकाणी शेजारील तालुके व पोलीस ठाणे, मुख्यालय व नियंत्रण कक्षातून बंदोबस्त मागवून तैनात केला जाणार आहे. बंदोबस्ताची आखणी व नियोजन पूर्ण झाले असून नागरिकांनी देखील स्वत:ची जबाबदारी समजून शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालक करावे, घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी केले आहे.आता ही गर्दी रोखणार कशीनागरिकांना खरेदीसाठी रविवार आणि सोमवार असा दोन दिवसांचा अवधी मिळणार आहे. त्यामुळे ही गर्दी आवरण्याचे मोठे आव्हान पोलीस आणि जिल्हा प्रशासनासमोर राहणार आहे. गर्दीला रोखण्यासाठीच लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आता दोन दिवसांची ही गर्दी रोखण्यासाठी प्रशासनाला मोठीच कसरत करावी लागणार आहे. आधीचाच लॉकडाऊन कडक केला असता तर आज ही वेळ आली नसती, असेही सांगितले जात आहे.सरकारी कर्मचाऱ्यांना ओळखपत्रावरच परवानगीलॉकडाऊन काळात ग्रामीण भागातून तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी येणाºया सरकारी अधिकारी व कर्मचाºयांना ओळखपत्राशिवाय परवानगी मिळणार नाही. दुचाकीवर येताना देखील फक्त एकच व्यक्ती येऊ शकते, सोबत दुसºया व्यक्तीला परवानगी नाही. दूध, भाजीपाला वाहतूक करणाºया वाहनांना मात्र प्रवेश असेल, त्याव्यतिरिक्त कोणतेही वाहन फिरु शकणार नाही. यावेळेचे लॉकडाऊन अतिशय कडक असणार आहे.वृत्तपत्रांचे घरपोच वितरण होणारसात दिवसांच्या लॉकडाऊनच्या या कालावधीत वृत्तपत्रांचे घरपोच वितरण करता येईल, असे जिल्हाधिकाºयांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव