शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव व चोपड्यात घरफोडी करणारा अट्टल चोरटा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 23:03 IST

शहरातील उस्मानिया पार्क व चोपडा येथे घरफोडी करणारा सुनील अमरसिंग बारेला (वय २० रा.गौºयापाडा, ता.चोपडा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी गजाआड केले. त्याच्याकडून एक महागडा मोबाईल व जळगावातून चोरलेले १२ हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत. दरम्यान, अट्टल चोरटा पकडल्याचे समजल्यानंतर चोपडा येथील उपअधीक्षक सदाशिव वाघमारे हे देखील शनिवारी जळगावात दाखल झाले होते.

ठळक मुद्देएलसीबीची कामगिरी दोन मोबाईल व १२ हजाराची रोकड हस्तगतगुन्ह्याची दिली कबुली

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२५ : शहरातील उस्मानिया पार्क व चोपडा येथे घरफोडी करणारा सुनील अमरसिंग बारेला (वय २० रा.गौºयापाडा, ता.चोपडा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी गजाआड केले. त्याच्याकडून एक महागडा मोबाईल व जळगावातून चोरलेले १२ हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत. दरम्यान, अट्टल चोरटा पकडल्याचे समजल्यानंतर चोपडा येथील उपअधीक्षक सदाशिव वाघमारे हे देखील शनिवारी जळगावात दाखल झाले होते.

उस्मानिया पार्क चोरीउस्मानिया पार्कमध्ये २७ जून रोजी पहाटे साडे पाच वाजता शेख शकील शेख इब्राहीम, शेख नाजीम शेख सुपडू, झयान शेख मुस्ताक व सलीम खान मुसाखान या चौघांच्या घरातून एकाच वेळी महागडे मोबाईल व काही रोख रक्कम चोरट्यांनी लांबविली होती. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. चोपडा शहरातही अशाच प्रकारे चो-या झाल्या होत्या. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. मालमत्तेच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी स्वतंत्र पथक तयार केले आहे. या पथकातील सहायक निरीक्षक सागर शिंपी, सहायक फौजदार मनोहर देशमुख, उत्तमसिंग पाटील, रवींद्र गायकवाड, विजय पाटील, नारायण पाटील, महेंद्र पाटील, बापु पाटील, रमेश चौधरी, मिलिंद सोनवणे, रामकृष्ण पाटील, सुशील पाटील, योगेश पाटील, मनोज दुसाने, महेश पाटील, गफूर तडवी व नरेंद्र वारुळे यांच्या पथकाने केलेल्या तपासात सुनील बारेला हा आरोपी निष्पन्न झाला. त्याची चौकशी केली असता त्याने दोन्ही ठिकाणच्या चोरीची कबुली देत मुद्देमालही काढून दिला.