जळगावात 22 जणांनी केला अवयवदानाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:26 PM2017-09-03T12:26:12+5:302017-09-03T12:27:12+5:30

प्रतिसाद : कवी संमेलनाद्वारे जनजागृती

In Jalgaon, 22 people decided to donate the organ | जळगावात 22 जणांनी केला अवयवदानाचा संकल्प

जळगावात 22 जणांनी केला अवयवदानाचा संकल्प

Next
ठळक मुद्देविविध उपक्रमांची माहितीसहभागी कवींचा गौरव नेत्रदान व अवयवदानाविषयी जनजागृती

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 3 -  जीवंतपणी रक्तदान, अवयव दान, तर मृत्यू पश्चात देहदान, नेत्रदान’, ‘जीवन के साथ भी जीवन के बाद भी रहो अपनो के साथ यासारख्या एकाहून एक सरस कवितांमधून नेत्रदान व अवयवदानाविषयी जनजागृती करण्यात येऊन त्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. 
मुक्ती फाउंडेशन व इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांच्या संयुक्तविद्यमाने रक्तदान व अवयवदान याविषयावर शनिवारी जिल्हा पत्रकार संघात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. 22 जणांनी अवयवदानाचा संकल्प केला. त्यांच्या निर्णयाचे उपस्थितांनी कौतुक केले.   प्रास्ताविक  मुकुंद गोसावी यांनी केले. गनी मेमन यांनी रेडक्रॉसच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कवी अशोक शिंदे, रेडक्रॉसचे सचिव विनोद बियाणी यांनी मानपत्र देत सहभागी कवींचा गौरव केला. राजेश यावलकर यांनी आभार मानले.
या कवींचा सहभाग
कवी संमेलनात घन:श्याम  भुते, अनिलकुमार चौधरी, तुषार वाघुळदे, भिमराव बा:हे, गोविंद देवरे, राहुल तायडे, काशिनाथ पवार, रा.ना.कापुरे, मनोज सपकाळे, एस.पी.गणेशकर, अजय तायडे, किशोर नेवे, अशोक पारधे, प्रा.डॉ. आशीष जाधव, रोहीत पाटील, प्रकाश दाभाडे, प्रा.प्रसाद नेवे, अजय माळी, रोहन शर्मा, डॉ. मेहुल पटेल या कवींनी सहभाग नोंदविला. 

Web Title: In Jalgaon, 22 people decided to donate the organ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.