शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

जिल्हाधिकाºयांच्या भेटीनंतर झाली सफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 23:41 IST

मंगळवारी अस्वच्छ असणाºया आदिवासी व मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहातील चित्र होते.

ठळक मुद्दे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर शासकीय वसतिगृहाला अचानक भेट़ तुटलेल्या दरवाजांच्या चौकटी तिथेच पडूऩ सोलर सिस्टिमला लागून असलेल्या कोपºयात वायरी उघड्याच़

आदिवासी व समाजकल्याण वसतिगृह : पलंग उघड्यावरच, गुटख्याचे डाग कायमआॅनलाईन लोकमतअमळनेर, दि़ २६ - स्वयंपाकगृहाची खोली, आतील परिसरही स्वच्छ, फरशी फिनाईलच्या पाण्याने पुसलेली... हे दुसºया कुठल्या ठिकाणचे चित्र नव्हते, तर मंगळवारी अस्वच्छ असणाºया आदिवासी व मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहातील चित्र होते. असे असले तरी आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील वरच्या मजल्यावर पलंग, गाद्या, तुटलेले दरवाजे उघड्यावरच पडलेले होते. खिडक्यांच्या बाजूला असलेल्या गॅलरीत मात्र गुटखा खाऊन थुंकलेले कायम होते. त्यामुळे येथील परिस्थितीत फारसा फरक दिसून आला नाही.जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी मंगळवारी दुपारी समाज कल्याण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहाला व लगतच्या आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाला अचानक भेट दिली होती. त्या वेळी तेथे अस्वच्छता दिसून आल्याने, जिल्हाधिकाºयांनी नाराजी व्यक्त करीत त्याबाबतची शेरेबुकमध्ये नोंद केली होती.या पार्श्वभूमीवर आज ‘लोकमत’ने या दोन्ही वसतिगृहाला भेट देत पाहणी केली.सर्वप्रथम आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाला भेट दिली. तेथे प्रवेशद्वाराजवळील परिसर, स्वयंपाकगृह या ठिकाणी स्वच्छता केलेली होती. मात्र, या ठिकाणी अन्न ठेवलेली भांडी अर्धवट उघडी ठेवलेली होती. मात्र, बेसीन चकाचक केलेले दिसून आले. मंगळवारी जिल्हाधिकाºयांना वरच्या मजल्यावर असलेल्या सोलर पॅनलवर कपडे वाळलेले टाकलेले दिसले, आज मात्र ती स्थिती नव्हती. परंतु या ठिकाणी पलंग, व गाद्या पडलेल्या होत्या. बाथरूमचे बांधकाम सुरू असल्याने, तुटलेल्या दरवाजांच्या चौकटी तिथेच पडून होत्या. तसेच सोलर सिस्टिमला लागून असलेल्या कोपºयात वायरी उघड्याच होत्या, विशेष म्हणजे त्याच ठिकाणी विद्यार्थी अंघोळ करतात. या वसतिगृहातील व्हरांड्यात गुटखा खाऊन थुंकलेले कायम होते, तर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्याच होत्या. दरम्यान, या ठिकाणी एकही वर्तमानपत्र दिसले नाही. खिडक्यांची तावदाने फुटलेलीच होती. समाज कल्याण विभागाच्या वसतीगृहात फरशी फिनाईलच्या पाण्याने पुसून ठेवली होती. विद्यार्थ्यांच्या खोल्यांमध्येही स्वच्छता दिसून आली.