शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

गुळ प्रकल्प भरला ७७ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 17:53 IST

चोपडा तालुका : पावसाने सलग दुसऱ्या वर्षी गाठली सरासरी

चोपडा : तालुक्यात सरासरी ७१९ मिलिमीटर एवढ्या म्हणजे १०० टक्के पावसाची नोंद शासकीय दप्तरी आहे. त्या तुलनेत दिनांक २७ आॅगस्ट पर्यंत ७१९.५ मिमी एवढा पाऊस पडला आहे.त्यात मालापुर येथील गुळ प्रकल्प एकूण जिवंत जलसाठयाच्या ७७ टक्के भरला आहे.दमदार पाऊस तालुक्यात पडल्याने या वर्षी या प्रकल्पात पाणी भरपूर जमा झाले आहे. एवढेच नाही तर दररोज या मध्यम प्रकल्पातून ५०० क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. तालुक्यात सध्या पर्यंत १००.०६ टक्के पावसाची नोंद शासकीय दप्तरी करण्यात आली आहे. तसेच या गुळ प्रकल्प परिसरात ९७० मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे, अशी माहिती शाखा अभियंता प्रीती पोटदुखे यांनी दिली. गूळ प्रकल्पात सध्याच्या पाणीसाठ्याची लेव्हल २६६.६९० मीटर एवढी आहे.या धरणात एकूण २३.२५ दलघमी एवढा एकूण साठा क्षमता आहे. त्यापैकी ०.४९ दलघमी एवढा मृत साठा आहे. आणि जिवंत पाणी साठा २२.७६ दलघमी एवढा आहे. जीवंत पाणी साठ्याच्या तुलनेत सध्याचा पाणी साठा १७.२९ दलघमी एवढा झालेला आहे. तर एकूण पाणी साठा १७.७८ दलघमी आहे. अजून काही दिवसात जोरदार पाऊस होऊ शकतो त्यामुळे हा प्रकल्प या वर्षी पूर्ण पाणी भरण्याची आशा आहे. आॅगस्ट अखेर पाण्याचा विसर्ग थांबविण्यात येतो व त्यानंतर पाऊस पडला तर धरणाची पाणी पातळी शंभरी कडे जाईल.