शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सर्व सदस्यांना सोबत घेऊन विकासात्मक कामांवर भर देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 12:37 IST

प्रभारी राज संपविणार : जि़ल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा रंजना पाटील व उपाध्यक्ष लालचंद पाटील यांचा ‘लोकमत’ला दिलेल्या सदिच्छा भेटीत निर्धार

जळगाव : पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे व आमदार गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाने सर्व सदस्यांना सोबत घेऊन ग्रामीण भागाच्या विकासात्मक कामांवर आगामी अडीच वर्षात अधिक भर देऊ व ही विकासात्मक वाटचाल कायम ठेवू, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा रंजना पाटील व उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी व्यक्त केला आहे़अध्यक्षा व उपाध्यक्षांनी गुरुवारी दुपारी ‘लोकमत’ शहर कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी व सहायक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी त्यांचे स्वागत केले.प्रभारी राज संपविण्यासाठी प्रयत्नजिल्हा परिषदेत किती विभागांमध्ये प्रभारी अधिकारी आहेत, याबाबत लवकरच संपूर्ण माहिती घेऊन नेत्यांच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवर याचा पाठपुरावा करणार आहे़ शिक्षण विभागाच्या बाबतीतही गांभीर्याने घेऊन तिथे नियमित अधिकारी मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे रंजना पाटील यांनी सांगितले़ भुसावळ तालुक्यात बदल्यांमध्ये झालेले प्रकार, मुक्ताईनगरमध्ये ज्या बदल्या दिल्या गेल्या या सर्वांची चौकशी करून याबाबतचे सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत़आगामी काळात विविध प्रश्नांवर सीईओंचे मार्गदर्शन घेऊन ते प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे रंजना पाटील यांनी सांगितले़ छापखान्यासंदर्भातही आम्ही सकारात्मक असून त्याबाबतही लवकरच निर्णय घेऊ, असे लालचंद पाटील यांनी सांगितले़चांगल्या कामांची पावतीलोकांची कामे करत वाटचाल सुरू आहे़ त्यामुळे आजपर्यंत चांगल्या कामाची पावती मिळाली आहे. सुरुवातीला ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळाल्यानंतर चांगल्या कामांमुळे जिल्हा परिषदेत पोहचलो़ नशिराबाद असो किंवा पूर्ण गट कधीही विरोधकांशी असलेल्या मतभेदांचा गावावर किंवा गटाच्या विकासावर कुठलाही परिणाम होणार नाही याची वारंवार काळजी घेतली़ आजही नशिराबाद गावासाठी आम्ही सर्व १९ प्रतिनिधी मिळून कामे करत असतो़ विकास थांबणार नाही, याची दक्षता आम्ही घेत असतो, असे उपाध्यक्ष पाटील म्हणाले़सदस्य व उपाध्यक्ष अशी तुलना नकोसर्व सदस्यांना आम्ही सांगितले आहे की, तुम्ही सदस्य आम्ही अध्यक्ष, उपाध्यक्ष अशी तुलना न करता सर्वांनी सोबत काम करायचे आहे़ सर्वांना न्याय देण्याची आमची भूमिका राहणार आहे, असेही या पदाधिकाऱ्यांनी सांगितले़

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव