शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बरं दिसतं का ते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 17:00 IST

धुळे येथील ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, कवी आणि सेवानिवृत्त प्राध्यापक अनिल सोनार ‘हसु भाषिते’ हे उपरोधिक मिश्कील शैलीतील सदर ‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल‘साठी दर आठवडय़ाला लिहिणार आहेत. या लेखमालेचा आज पहिला भाग.

सुभाषितांशी माझी पहिली भेट मराठी शाळेतल्या भिंतींवर झाली. शाळेच्या दगडी भिंतीची बाहेरची बाजू पेन्सील घासून तिला टोक काढण्यासाठी असते, तर भिंतीची वर्गातली किंवा व्हरांडय़ातील आतली बाजू सुभाषिते लिहिण्यासाठी असते, अशी माझी बालसमजूत बराच काळार्पयत टिकून होती. ‘सर्वेकम नमस्कारम नारायणम् प्रति गच्छती’, ‘लुळया पांगळया श्रीमंतीपेक्षा, धट्टी कट्टी गरीबी बरी.’ ‘‘शाळेसी जाताना वाटेत थांबोनी, नाच तमाशे पाहू नये,’ अशी कित्येक सुभाषिते आम्ही, शिक्षक वर्गात नसताना एका सुरात, एका तालात, एका लयीत केकाटत असू. (म्हणाल तर शिक्षक वर्गात असायचे, म्हणाल तर नसायचे. म्हणजे ते वर्गाच्या दारात उभे राहून, पलीकडच्या वर्गाच्या दारात उभ्या असलेल्या दुस:या वर्गातल्या शिक्षकांशी बोलत असायचे.) आमच्या मुख्याध्यापकांचं नाव ‘नाराण मास्तर’ होतं. त्यामुळे ‘कोणत्याही गुरुजींना केलेला नमस्कार, नारायण मास्तरांना पोचतो, हा अर्थ कळणं कठीण गेलं नाही. पण ‘लुळया पांगळया श्रीमंतीपेक्षा, धट्टी कट्टी गरीबी बरी’ ह्या सुभाषितांचा अर्थ पचनी पडणं बरंच कठीण गेलं. कारण एक घोळ होता. दिनेश गांधी नावाचा धट्टा कट्टा श्रीमंत मुलगा त्याच्या घरच्या तांग्यातून शाळेत ये-जा करायचा. तर दोन्ही पायांवरून वारं गेलेल्या, अतिशय गरिबीचं जिणं जगणा:या जगन्नाथाला त्याचे वडील खांद्यावरून उचलून आणून वर्गात सोडायचे. तेव्हापासून ‘धट्टी कट्टी गरीबी’ ह्या सुभाषिताशी मी कट्टीच घेतली. ‘शाळेसी जातांना, वाटेत थांबोनी, नाच तमाशे पाहू नये.’ हे सुभाषित असे आहे, हे मला फार उशिरा कळले. कारण वर्गाच्या भिंतीवर ते सुभाषित लिहित असताना मध्येच खिडकी आल्यामुळे ते खिडकी पाशी, नको तिथे तोडून दोन तुकडय़ात लिहिले गेले होते. जसे दिसे तसेच आम्ही वाचत असू. त्यामुळे वाटेत थांबून वाटेल ते केले, तरी घरी कळण्याचा प्रश्नच नसताना, फक्त ‘नाचत मासे’ पाहू नये, अशी स्वतंत्र सूचना का? हे काही केल्या कळेना. बरं मासे पाण्याबाहेर काढले की तडफडतात. मग वाटेत येऊन नाच कसा करत असतील? शेवटी वर्गातल्या हुशार मुलाने खुलासा केला, ‘अरे, नाचत मासे पाहू नये म्हणजे, रस्त्यात पडलेल्या माशाला आपण नाचत पाहू नये. आपण नाचू नये. मासे कसे नाचतील? भूत दया म्हणून काही आहे की नाही? मासा तडफडतोय, आणि आपण त्याच्याकडे बघत नाचतोय. बरं दिसतं का ते.’ मला त्याचे म्हणणो पटले. पण तरीही मी म्हणालो, ‘गणपतीला आपण पाण्यात बुडवतो. गणपती बुडत असतो आणि आपण आनंदाने नाचत असतो. बरं दिसतं का ते?’ त्याला ते पटलं. तो लगेच म्हणाला, ‘अरे, सुभाषितांवर आपल्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा आहे. तू भाग घे. पहिलं बक्षीस सहज मिळवशील.’ मी भाग घेतला. बोललो. नंतर वर्गशिक्षकांनी इतकी कुभाषिते मला ऐकवली आणि माङया दोन्ही गालांवर एवढा बक्षिसांचा वर्षाव केला, की सात-आठ दिवस शेजारी-पाजारी मला ‘गाल फुगी’च झालीय, असं समजत होते. त्यानंतर सुभाषितांचं नाव काढायचं नाही, अशी शपथ घेतली होती. पण ‘नावात काय आहे?’ असं सुप्रसिध्द सुभाषितच आहेना. ‘आजचा सुविचार’ ह्या नामांतरासकट ते विद्यालयात रोजच वाट आडवू लागले. ‘आजचा सुविचार’ रोजच वाचायचा आणि वहीत लिहून घ्यायची सक्तीच. माझी अवस्था अगदी, ‘हसता नाही, पोसता नाही’ अशी दरिद्री माणसासारखी झाली. ‘तुझं अक्षर छान आहे. आजपासून फळ्यावर सुविचार तुच लिहायचा हं.’ मुख्याध्यापकांनी शाबासकी नावाचा जबरजस्त धपाटा पाठीत हाणला. सर्व विद्यार्थी मला फिदी फिदी हसत असल्याचा भास मला झाला. ‘हसतील त्याचे दात दिसतील’ म्हणत मी तो ‘एक सक्तीचा जहरी प्याला’ही पचवला. मनातला सूवचनीय संघर्ष इतका पेटला की ‘अती झालं आणि हसू आलं’ न्यायाने, मी लेखक झालो. मनात वाचकांना प्रार्थना करायचो, ‘जे लिहितोय ते हसून गोड करून घ्या.’ पण प्रतिक्रिया भलत्याच येऊ लागल्या. गंभीर प्रकृतीचे थोर विद्वानही हसत हसत म्हणायला लागले, ‘हसता हसता दात पाडण्याची कला तुम्हाला चांगली जमलीय की.’ पण मला माहीत होतं की हे हसूभाषित म्हणजे ‘आपण हसे दुस:याला, अन् शेंबूड आपल्या नाकाला’ असा प्रकार आहे. नाही तर गुरुजींनी माङया गालावरून ओघळवलेल्या ‘आसू भाषितां’चा अर्थ काय?