शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशी परंपरेचा ‘कुंभ’मेळा, चैत्र वैशाखनं ऊन.. त्यात आखाजीसारखा सण..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 10:57 IST

सासुरवाशिणीचा विरंगुळा

ठळक मुद्देकृषी संस्कृतीचा कळवळापूर्वजांचे मात्र होतेय स्मरण

संजय हिरे / आॅनलाइन लोकमतखेडगाव, जि. जळगाव, दि. १८ - चैत्र पौर्णिमेनंतर खान्देशात वेध लागतात ते अक्षयतृतीया अर्थात आखाजीचे. आम्रवृक्षाची चैत्र पालवी, वाऱ्याची हळुवार झुळक हा बदल नुकत्याच लग्न होऊन सासरी गेलेल्या सासुरवाशिणीसाठी माहेरचा सांगावा असतो. वैशाख वणव्याच्या तोंडावर वातावरणातील रुक्षता वाढीस लागलेली असते. माहेरून भाऊ मुºहाळी आलेला असतो. गौराईचे आगमन झालेले असते. आखाजीचा सोहळा सुरू होतो तसा स्री मनाला विरंगुळा यातून मिळतो. उना आखाजीना सण गौरताबाईभाऊ बहिनले लेवाले गौरताबाईकाळा बाभुयले धजा गौरताबाईमाहेरच्या वाटेवर ऊन मी म्हणत असते. ..तिच्या तोंडून सहजपणे काव्य उमटते-चैत्र वैशाखन ऊन व माय ऊनखडके तापुनी झाले लाल लाल व मायवाळू तापे बालम बाल व मायमाझे गौराईच्या पायी आले फोड व मायवाटवर कशियान झाड व माय?वाटवर बकामन झाड व मायगवराई रमनी घटकाभर व मायगौराई म्हणजे पार्वती - शंकर. हरी म्हणजे तिचा कन्हेर. सासुरवाशीण आपल्याला गौराईच्या रूपात जणुकाही पाहात आपल्या मनातील भावभावना मोकळ्या करते. आखाजीचा सण निमित्त असते.आखाजीसारखा सण ..फुईजी जाऊ मी टीपरना खेवालेसासरा, मामांजी बठेल व्हता,लाल देव्हडी गोल चावडीले.धन्य धन्य पोरी तुले टिपºया खेवाले...घरकन उनी गिरकी, पडी गऊ धरनीले.गौराई, आखाजीच्या गाण्यातून माहेर, भाऊ, त्याचे वैभव, दागदागिने याशिवाय पूर्वीच्या बाराबलुतेदार व त्यावर आधारित कृषी संस्कृतीचा अभिमान डोकावत असतो.आपल्या बंधूच्या शेतातील आम्रवृक्ष, तापी-गिरणा नदी जणुकाही तिच्या बंधुरायाचे वैभवच, म्हणून ती उंचच उंच जाणाºया झोक्यावर बसून गुणगुणतेकाया वावरमा झोपाया अंबा,तठे उतरनी गौराई रंभागौराई रंभाले काय काय लेन,गौराई रंभाले तोडा लेनमाय माले तोडा ली ठेव जो,बंधु ना हाते दी धाड जो.याशिवाय गाण्यातूनतापी-गिरणा ना मेय व माय गिरणाना मेयतठे काय सोनाना पिपय वमाय सोनाना पिपयतठे काय चांदी न्याहलकड्या व माय हलकड्यातठे काय रंगीन पायना व माय पायनात्यावर नीजे शंकर हरी व माय शंकर हरी.,.झोका देय गौराई नारी व माय...घराच्या एका कोनाड्यात बसविलेली गौराई, मुरमुरे, बोरं, डांगराच्या बिया, रोज नवनव्या माळा व रात्री उशिरापर्यंत टिपºया, झोका असा खेळ रंगत असतो. लहान मुली भल्यापहाटे शिवारातील वाहणाºया नदीकाठावरील आंब्याच्या झाडाखाली चला व माय..गौरन पाणी खेवाले... म्हणत स्वच्छंदपणे झिम्मा-फुगडी, वाटेवरील वाटसरूला अडवून पैशांची मागणी व त्यातून खाऊची लयलूट करतात. अन् मग गौराईला निरोप देण्याचा दिवस उजाडतो. एका मुलीला सुटबुट, गाँगल घालत 'मोगल, सजतो. गावातून मिरवणूक निघते.अरे तु सुटबुटवाला मोगल, मना घर येजो रेतुले टाकस चंदन पाट, मना घर येजो रेतुले वाढस केसरी भात, मना घर येजो रेवरथुन लावसु तुप नी धार, मना घर येजो रेमिरवणूक दोन गावांच्या सीमेवर येऊन ठेपते. तेथे आधीपासूनच दुसºया गावातील मोगल आपल्या गावातील मुलींच्या लवाजम्यासह डेरेदाखल झालेला असतो. मग मनसोक्त शिव्यांची लाखोली एकमेकांना वाहिली जाते. वर्षभराचा शीण उतरतो. भावनिक कोंडमारा मोकळा होतो! मग सुरू होते दगड-गोट्यांची पत्थरबाजी. सूर्यदेव अस्ताला जायची तयारी करतो तशी गावशिव मोकळी होत जो-तो घराकडे परततो. दुसºया दिवशी गौराई चालनी गंगातीरी व माय... म्हणत गौरी विसर्जन होते. सासरचा घ्यायला आलेला टांगा धूळ उडवत 'ति’च्या गाण्यातील शंकरहरीच्या घरी नेऊन सोडतो. आता मात्र हे सर्व विस्मृतीत गेलेय.कुठाय कृषी संस्कृतीचा कळवळा?आखाजी हा सण काही गौराई, झोक्यावरील गाणे व माहेरवाशिणीपुराता मर्यादित नव्हता. येथे पूर्वजांनी बारा बलुतेदांरापासून शेतावर काम करणाºया सालदारांचा विचार करणारी रचना करून ठेवली होती. लोहार, सुतार, शिंपी, न्हावी, कुंभार यांना या दिवसात काम उपलब्ध होत गव्हाईच्या रूपात धान्य व शेतातील निघणाºया शेतमालाचे खळे मिळत असे. आखाजीला खळे कारू-नारूंना वाटप होई. आता रोख पैसा देऊन कामे उरकली जातात. गावातील, घराघरातील छोटी-मोठी कामे करण्यास कारू-नारूंची मदत होई. आता ही चाल जवळजवळ बंदआखाजीच्या एक महिना आधी सालदार-महिनदार ठरत. गावागावात शे-पाचशे खटले व तेवढेच सालदार पाहायला मिळत. आता गावागावात दोन-चार स्थानिक सालदार राहिलेत. आहे ते सालदार मालदार बनल्याने आता सातपुड्यावर(पावरा मजूर) दारोमदार आहे. आखाजीला चांगल्या सालदाराची शोधमोहीम आता थंडावली आहे. जमिनीचे क्षेत्र घटल्याने रोजंदारीवरच भागवले जातेय. पूर्वजांनी आखाजी साजरी करताना घातलेला हा मेळ, कळवळा संपतोय.पत्ते कुटणाºयांसाठी बाराही महिने आखाजी. नाही म्हटल्यास आखाजीला पत्ते कुटण्याचे वैशिष्ट्य चिटकून आहे.गावोगावी पत्त्यांचे डाव आजही चालतात. काही गावात तर पत्ते कुटणाºयांसाठी जणुकाही बाराही महिने आखाजी असल्यागत पत्त्यांचे डाव चालतात. आखाजी उरली पत्त्यांपुरती असेच चित्र आहे.पूर्वजांचे मात्र होतेय स्मरणघरातील पितरांचे स्मरण-पूजन आज मात्र डेरगं भरण्याच्या रूपात आवर्जून खान्देशातील घराघरातून होतेय. यासाठी घागर भरणे, पूजन आदी विधी जिवंत आहे हीच एक पवित्र परंपरा टिकून आहे. आखाजीनिमित्त हेही नसे थोडके असे म्हणण्यास जागा आहे.एक झोका..चुके आखाजीचा मोका : घराच्या कोनाड्यात गौराई आहे पण झोका, झिम्माफुगडी, गौरचे पाणी खेळण्याचा डाव रंगणे दुर्मीळ झाले आहे. आम्हना टाइमले महिना ना वाये...झोका टांगला जात होता. आता आखाजीच्या दिवशीच तो मारून-मुटकून टांगलेला दिसतो. झोकाच नाही, त्यामुळे आखाजीचे गाणेही विसरत चाललोय, असे सांगणाºया आजीबाई भेटतात तेव्हा आखाजीचे खानदेशपण हरवत चालल्याची खात्री पटते. चैत्र वैशाखनं ऊन.., आथानी कैरी..तथानी कैरी.., आखाजीसारखा सण, सण बाई टिपरना खेवाले..या सहज ओठावर रुळणाºया गाण्यातील एक-दोन कडव्यातच आखाजी अडकून पडलीय हेही तितकेच खरे!पथराड येथे यात्रोत्सवाची परंपराधरणगाव तालुक्यातील पथराड येथे अक्षयतृतीयेला यात्रेची परंपरा आहे. केवळ पथराडच नव्हे तर पंचक्रोशीतील नागरिक या यात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहात असतात. त्यानुसार सालाबादाप्रमाणे यंदाही हा मरीआईचा यात्रोत्सव येथे होत आहे. यात्रेत मरीआईला नवस फेडले जातात. सायंकाळी बारागाड्या ओढल्या जातात. या वर्षी बारागाड्या ओढण्याचा मान कैलास नाईक यांना मिळाला आहे.पडतेय.

टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय तृतीयाJalgaonजळगाव